शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 05:46 IST

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह ‘वर्षा’वर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह ‘वर्षा’वर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. आपण तुमच्यासोबत आहोत, आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत, याचे स्पष्ट संकेत दिले.

भाजपकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी आणि नेते पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी असा प्रकार सुरू असल्याने शिंदेसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. 

मंगळवारच्या या नाराजीनाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले. दिल्ली भेटीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ५० मिनिटे चर्चा केली. तसेच आपली भूमिका आणि नाराजी त्यांच्यासमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

महायुतीची एकत्रित  प्रतिमा कायम ठेवणार

- अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची एकी मजबूत ठेवण्याबाबत चर्चा केली. या चर्चेत आगामी ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महापालिका निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पवार व पटेल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर महायुतीची एकत्रित प्रतिमा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

- शिंदेसेनेप्रमाणे अजित पवार गटाने भाजपतील नेत्यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केलेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचा संदेश विरोधकांकडे जाऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत, अशी भूमिका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी युती झाली नाही तरी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊन महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल, असेही पवार आणि यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Mahayuti Alliance: Shinde in Delhi, Pawar at CM's Residence

Web Summary : Amidst Sena's discontent, Shinde met Shah in Delhi while Pawar assured Fadnavis of unity. Alliances aim to contest local elections together, maintaining a united front despite internal friction within the Mahayuti coalition.
टॅग्स :MahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे