महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 20:05 IST2023-04-21T20:04:51+5:302023-04-21T20:05:17+5:30

राऊत यांनी सामनातून मांडलेल्या विचारांवर अजित पवार यांनी कठोर भाषेत फटकारले होते. यानंतर राऊतांनीही पवारांना मोठ्या पवारांचा हवाला देत आपण असत्य बोलत नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या वादावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे. 

Mahavikas Aghadi will not last anymore, Ajit Pawar's chair not there on 1st may Vajramuth ralley; Big claim of Shinde group mla Sanjay Shirsat, also talk on Sanjay Raut | महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा

महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात वाक् युद्ध रंगले आहे. यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नाहीय असे वातावरण तयार होत होते. राऊत यांनी सामनातून मांडलेल्या विचारांवर अजित पवार यांनी कठोर भाषेत फटकारले होते. यानंतर राऊतांनीही पवारांना मोठ्या पवारांचा हवाला देत आपण असत्य बोलत नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या वादावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे. 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊत-पवार वादावर मोठा दावा केला आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना फोडली, हे मी पूर्वीपासून सांगत आलो आहे. आघाडी कधीही राहू नये असे राऊत यांना वाटत होते. यामुळे महाविकास आघाडी देखील टिकणार नाही, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.  

महाविकास आघाडीची सत्ता असताना जर कोणाला प्रवेश होता ते म्हणजे जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाडांनीच अजित पवार यांच्या पहाटे शपथ विधीवरून जोडे मारो आंदोलन केले होते. ते आता दादांना बोलत आहेत. जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यासोबत कधीच नव्हते आणि राहणारही नाहीत, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. 

१ तारखेला होणाऱ्या सभेत अजित पवार यांच्यासाठी व्यासपीठावर खुर्ची राहणार नाही. महाविकास आघाडी ही मूळातच चुकीच्या पद्धतीने झाली होती. ते आता उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. आम्ही बरोबर होतो हे कळाले असेल, असा दावा शिरसाट यांनी केला. 

Web Title: Mahavikas Aghadi will not last anymore, Ajit Pawar's chair not there on 1st may Vajramuth ralley; Big claim of Shinde group mla Sanjay Shirsat, also talk on Sanjay Raut