शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Video: पंकजाताईंचं तिकीट कापलं, तेव्हा ‘धनुभाऊं’ना काय वाटलं?... ऐका त्यांच्याचकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 18:01 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे , विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांचं विधानपरिषदेचं तिकीट ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांचं विधानपरिषदेचं तिकीट कापण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या निर्णयामुळे भाजपामध्ये फूट पडेल, बंड होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. विशेषतः खडसे आणि पंकजाताई काय करतात, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, थोडा राग आणि नाराजी व्यक्त करून ते शांत झालेत. त्यांना तिकीट मिळायला हवं होतं, असं त्यांच्या समर्थकांना वाटणं स्वाभाविकच आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे मंत्री आणि पंकजाताईंचे बंधू धनंजय मुंडे यांनीही काहीशी तशीच भावना व्यक्त केली आहे.

उमेदवारी का दिली नाही, हा भाजपाचा पक्षांतर्गत विषय आहे. पण, एखादा मंत्री पराभूत होतो, तेव्हा त्या नेत्याला पुनर्जीवित करण्यासाठी आमदारकी देणं, विधानपरिषदेवर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला, असं धनंजय मुंडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

‘‘गोपीनाथ मुंडेंना दिलेला त्रास सगळ्यांना माहीत आहे!’’

भाजपाने पंकजा मुंडेंचं तिकीट कापलं असलं तरी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर, तर गोपीनाथ मुंडेंचे समर्थक रमेश कराड यांना विधानपरिषदेवर पाठवून वंजारी समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. याकडे लक्ष वेधलं असता, त्याचा फारसा फायदा भाजपाला होणार नसल्याचं मत धनंजय मुंडेंनी मांडलं.  मी भाजपामध्ये होतो, त्याला बराच काळ लोटलाय. आता भाजपामध्ये नवं पर्व सुरू झालंय. त्यांनी राज्यसभेत किंवा विधानपरिषदेत वंजारी समाजाला कितीही प्रतिनिधित्व दिलं, मंत्रीच काय, पण मुख्यमंत्री वंजारी समाजाचा केला; तरी या समाजाचा जनाधार त्यांनी गमावला आहे. गोपीनाथ मुंडेंना पक्षाने काय त्रास दिला, कशा पद्धतीची वागणूक दिली, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे वंजारी त्यांच्यासोबत जाणार नाहीत, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमकपणे भूमिका मांडणारे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याचे मंत्री धनंजय मुंडे कोरोना संकटाच्या काळात फारसे प्रकाशझोतात नव्हते. आपल्या जिल्ह्यात राहून आपण काम करत होतो, असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेता असताना जी आक्रमकता आपण पाहिलीय, तशी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार नाही. मात्र, उपेक्षित, वंचितांना न्याय देण्याच्या दृष्टीने या खात्याचा अभ्यास, नियोजन केल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय खात्याच्या कुठल्याही योजनेच्या आर्थिक तरतुदीला कात्री लागू नये, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

पाहा धनंजय मुंडेंची संपूर्ण मुलाखतः

आणखी वाचाः

राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या आमदारकीची दिलेली ऑफर स्वीकारणार?; राजू शेट्टींनी केला मोठा खुलासा

'मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला वाटतं त्याला कमी समजतं'; फडणवीसांचा पवारांवर निशाणा

सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस