शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार कधी स्थापन होणार?; मुख्यमंत्र्यांचं अवघ्या एका शब्दात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 13:40 IST

Maharashtra Election Result 2019: निकालानंतरच्या 9 दिवसांनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम

अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेताची पाहणीदेखील केली. सरकारकडून शेतकऱ्यांना पूर्ण मदत दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्यात आलेल्या महाचक्रीवादळात मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय 30 ते 40 वर्षानंतर ऑक्टोबरमध्ये पाऊस आल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सोयाबीन, कापूस, ज्वारीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यासाठी 10 हजार कोटींची तरतूद काल जाहीर केली आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मदतीचा निर्णय ठरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना आधार देताना शासकीय यंत्रणेनं संवेदनशील राहावं, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. दुष्काळी परिस्थितीत आपण जी मदत करतो, ती सर्व मदत आताही करायची आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही वसुलीला सामोरं जावं लागू नये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.यावेळी मुख्यमंत्र्यांना राज्यात सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'लवकरच' असं उत्तर त्यांनी दिलं. निवडणुकीच्या निकालाला 9 दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी उद्धव यांना नवा प्रस्ताव पाठवल्याचं समजतं आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटू शकतो.नव्या प्रस्तावात काय?मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहील. मात्र मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ, असं आश्वासन नव्या प्रस्तावात देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त मंत्रिपदं (एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री) दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जावी. याशिवाय राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं, अशा मागण्या उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा फडणवीस यांच्याकडून उद्धव यांना हा नवा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा