शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांनी 'ती' धमकी खरी करून दाखवली; शिवसेनेला दे धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:40 IST

Maharashtra Election Result 2019 लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला इशारा खरा ठरला

पुरंदर: राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मतमोजणीतून जनतेचा कौल स्पष्ट होऊ लागला आहे. भाजपाच्या जागा कमी होत असताना शिवसेनेच्या जागा कायम राहताना दिसत आहेत. मात्र पुरंदरमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारेंना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धमकी खरी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना जाहीर धमकी दिली होती. 'यंदा बघतो तू कसा आमदार होतो ते,' अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. 'शिवतारे तर काय पोपटासारखा मीठू मीठू बोलू लागलाय.. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती.. तुझा आवाका किती.. तू बोलतोय कोणा बरोबर.. तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी.. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाय करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या.. गप्प बसा गप्प बसा.. पण याचं तर उर भरून आलंय.. त्याला काय करू, काय नाय होतंय... आता 2019ला हा कसा आमदार होतो तेच मी बघणाराय', असं अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं. पुरंदरमध्ये विजय शिवतारेंचा पराभव झाल्यानं अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला इशारा खरा ठरला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा 30 हजार 820 मतांनी पराभव केला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विजय शिवतारेंना भरसभेत इशारा देणाऱ्या अजित पवारांनी बारामतीत विजयाच्या दिशेनं दमदार वाटचाल केली आहे. बारामतीत भाजपाच्या गोपीचंद पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं डिपॉजिट जप्त केलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाpurandar-acपुरंदर