शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:57 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या संजय राऊतांवर घणाघाती टीका

मुंबई: राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षांमधील संवाद जवळपास संपुष्टात आला असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार भाजपाला लक्ष्य करत आहेत. यावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा, असं रवी राणा यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेला भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी ठरलेल्या फॉर्म्युल्याची या तीन नेत्यांना कल्पना आहे. मात्र संजय राऊत गरज नसताना दररोज भाजपावर टीका करत आहेत. शिवसेनेनं भाजपासोबत निवडणूक लढवली. भाजपाबरोबर युती केल्यानंच त्यांच्या 56 जागा निवडून आल्या. अन्यथा त्यांना 25 चा आकडादेखील गाठता आला नसता, अशा शब्दांत राणा यांनी राऊत आणि शिवसेनेचा समाचार घेतला. विधानसभा निवडणूक भाजपासोबत लढलेली शिवसेना आज कोणत्या प्रकारचं राजकारण करतेय, हे राज्यातील जनता पाहतेय. ही जनताच पुढे शिवसेनेला धडा शिकवेल, असंदेखील राणा म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला विरोधी पक्षात बसण्याचंदेखील आव्हान दिलं. हिंमत असेल तर शिवसेनेनं विरोधी पक्षात बसावं. दोन महिन्यांत त्यांचे 20 ते 25 आमदार पक्षातून बाहेर पडतील. कारण शिवसेनेतील बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत. या आमदारांना मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आवडते, असंदेखील ते म्हणाले.शिवसेनेचे 20 ते 25 आमदार सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. 'गेल्या 5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील,' असं राणा म्हणाले. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRavi Ranaरवी राणा