शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली निवडणूक निकालः राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी, सुमनताई पाटील विधानसभेची परीक्षा पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 12:46 IST

Sangli Vidhan Sabha 2019 Result: आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे.

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या विजयी उमेदवार म्हणून तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून सुमन पाटील यांच्या नावाची घोषणा होत आहे. राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून आणि मतदारसंघात सुमनताई पाटील विजयी झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या विजयी उमेदवार म्हणून त्यांच नाव चर्चेत आलं आहे. पहिल्या फेरीपासूनच सुमन पाटील यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरात सुमनताई पाटील यांना 9123 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांना 3535 मिळाली होती. 

आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर सुमनाताई पाटील यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, आबांच्या सहानुभूतीचा हा परिणाम असल्याचं त्यावेळी सांगण्यात येत होतं. त्यामुळे, यंदाची ही निवडणूक सुमनताई पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा आणि परीक्षा असल्याचे सांगण्यात येत होते. या परीक्षेत सुमन पाटील यांनी पास होऊन दाखवले आहे. आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. रोहित यांच्या रुपात अनेकांना आबाचा भास होत. त्यामुळे रोहित यांच्या साधेपणाचा आणि भाषणाचा प्रभाव मतदारसंघातील प्रचारात जाणवला आहे. सुमन पाटील यांनी विजय मिळवत घोरपडे यांचा पराभव केला आहे.   

टॅग्स :sangli-acसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sumantai patilसुमनताई पाटील