शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 10:55 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :  मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे नवीन सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. दरम्यान, काहीजण या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक मानत आहेत. विधानसभेच्या २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. तसेच, महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. 

महाविकास आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक १०२ जागा लढवल्या, पण त्यांना केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात अशा काही गोष्टी घडल्या की, जर मताधिक्य थोडे कमी झाले असते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची साकोलीची जागा गमवावी लागली असती. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे आणि इतर पक्षांचे काही विजयी आमदारही निवडणुकीत पराभूत झाले असते.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार १६२ मतांनी विजयी झाले, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून २०८ मतांनी विजयी झाले आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात एआयएमआयएमचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी 'भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र'चे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा १६२ मतांनी पराभव केला.

या जागांवरही फासे पलटले असतेभंडारा जिल्ह्यातील साकोली येथे नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा २०८ मतांनी पराभव केला. नवी मुंबईतील बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे अवघ्या ३७७ मतांनी विजयी झाल्या. बुलढाणामधून शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड ८४१ मतांनी विजयी झाले. कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी १२४३ मतांनी आपली जागा राखली.

मंत्रीही अल्पमतात विजयी झालेराज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून १५२३ मतांनी विजयी झाले. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत परंडा मतदारसंघातून १५०९ मतांनी विजयी झाले. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे उमेदवार अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून २१६१ मतांनी विजयी झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीManda Mhatreमंदा म्हात्रेSanjay Gaikwadसंजय गायकवाडRohit Pawarरोहित पवार