शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 19:31 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विरारमध्ये आज भाजपा नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआने केला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक आहे. महाराष्ट्रात उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यादरम्यान आज विरारमधील एका हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रतिक्रिया दिली, त्रिवेदी यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले.

Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने शेवटचा खोडसाळ प्रयत्न म्हणून बिनबुडाचे आरोप केले. विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि पक्षाची अनेक कामे पाहत आहेत. नालासोपारा मतदारसंघातील उमेदवाराने त्यांच्यावर आरोप केला आहे. त्यांना सभेला उपस्थित राहण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना दिल्या. बिनबुडाचे आरोप करू नका, असा टोलाही  सुधांशू त्रिवेदी यांनी लगावला. 

मतदानापूर्वी महाविकास घाडीच्या नेत्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. वसई विरारमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. विनोद तावडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

भाजपा नेते विनोद तावडे यांनी आपल्यावर झालेले आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे. 

 ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे

राजन नाईक यांनी सांगितले की निवडणुकीच्या दिवशी आचारसंहितेच्या दिवसाची माहिती द्यावी. ती माहिती मी दिली. या राड्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेऊ आणि प्रश्न विचारतील त्याची उत्तरे देऊ जनता निर्णय घेईल असे आम्ही ठरवले आणि इथे आलो, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तसेच हे पैसे माझे नाहीत असा दावाही तावडे यांनी केला आहे. 

ज्या पैशांवरून राडा केला ते माझे नाहीतच. ज्या खोल्यांत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो, असे तावडे यांनी म्हटले आहे. याचबरोबर जेवढा त्यांनी दावा केला आहे तेवढे पैसे सापडले नाहीत तर मी ते ठाकुरांकडून वसूल करणार आहे, असेही तावडे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडे