शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:22 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज विरार येथे भाजपा नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआ'ने केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : निवडणुकीच्या आदल्या दिवशीच विरारमध्ये भाजपा नेते विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बविआ'ने केला आहे. विरार येथील एका हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून होते. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.  पोस्टमध्ये म्हटले आहे की, अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला,  भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

"लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून ठेवण्यासाठी आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विनोद तावडे यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे, असंही पटोले यांनी म्हटले आहे. 

'विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप'  

हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

भाजपा नेत्यांनी काय सांगितले?

विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinod Tawdeविनोद तावडेNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४