Maharashtra Vidhan Sabha 2019 Sharad Pawar's stamp on congress seat sharing | Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या जागावाटपावर शरद पवारांचे शिक्कामोर्तब

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या जागावाटपावर शरद पवारांचे शिक्कामोर्तब

नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे. ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असून, त्या जागा कोणत्या, यावर दोन्ही पक्षाचे नेते उद्या मुंबईत चर्चा करणार आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते दहा विधानसभा मतदारसंघांत बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष घेतील. आघाडीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा सहभाग राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरे यांची भूमिका मान्य नसून, मित्रपक्षांनीदेखील मनसेला सोबत घेण्यात सकारात्मकता दर्शविलेली नाही, असेही पवार यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असून, राष्टÑवादी कॉँग्रेसने या निवडणुकीत नवीन चेहºयांना संधी देऊन तरुण पिढीचे नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
>ईडीच्या नोटिसांद्वारे राष्टÑवादी नेत्यांना धमकी
ईडीची नोटीस दाखवून माझ्या सहकाºयांना धमकावण्यात आले. मी नावे उघड करणार नाही. मात्र, आमच्यातून गेलेल्या काही जणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का? इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Sharad Pawar's stamp on congress seat sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.