शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Vidhan Sabha 2019: मनसेला लढण्याची आताच आहे संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 4:33 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- अजून लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत मिळतील.

- रवींद्र मांजरेकरराज ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ उमेदवारांच्या सोबतीला असेलच. विरोधी मतांची फाटाफूट होईल, याची चिंता करण्याचे मनसेला कारण नाही. राज्यात या पक्षाची काय स्थिती आहे, अजून लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत मिळतील.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शिवाय निर्णय काय होईल हे ठाउक नसल्याने आता अस्वस्थताही आहे. या नेत्यांनी बैठकीत नेहमीप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टाकली. पण गेल्या काही दिवसात ते काहीच बोललेले नाहीत. त्यांच्या मौनाची कारणे त्यांनाच माहिती. मात्र त्यांना निर्णय तर तातडीने घ्यावाच लागेल.गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवता मोदी सरकारच्या विरोधात मोजक्याच प्रचार सभा घेऊन हवा तयार केली. त्याचा काही परिणाम मतदारांवर झाल्याचे निकालात दिसले नाही. त्याउलट मोदी सरकारचीच जोरदार सरशी झाली. केंद्र सरकारच्या विरोधात उपस्थित केलेले मुद्दे, सरकारकडून दिली दिशाभूल करणारी आकडेवारी, धोरणातील दुटप्पीपणा हे ठाकरे यांनी लोकांना उच्चरवात सांगितले खरे. पण मतदारांनी ते सगळे नाकारले. त्या सगळ्यापेक्षा सरकारने किंवा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले त्यावरच मतदारांनी विश्वास ठेवला. सरकारची विश्वासार्हता ही त्या सगळ््या आरोपांपेक्षा जास्त प्रभावशाली ठरली. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली मेहनत वाया गेली.मतदान झाल्यावर मनसेने इतर विरोधी पक्षांसोबत इव्हीएमचा मुद्दा हाती घेतला. त्या विरोधात मोर्चा काढण्याचे जाहीर केले. पण आधी महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे आणि नंतर खुद्द ठाकरे यांच्या ईडी चौकशी नाट्यामुळे तो मोर्चा मागे पडला. आता प्रश्न आला तो विधानसभा निवडणुकांचा. त्यावर पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींना पक्षाने ही निवडणूक लढवावी असे वाटते, तर काहींनी ईव्हीएमवर मतदान होणार असेल तर निवडणूक लढवू नये असे मतप्रदर्शन केले आहे.

खरेतर मनसेने ही निवडणूक लढायलाच हवी. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक हे कार्यकर्ते प्रशिक्षणासाठी सगळ््यात महत्त्वाचे साधन आहे. त्यापासून कार्यकर्त्यांना असे वारंवार वंचित ठेवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.वास्तविक, कमीत कमी पैशात, स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन, पद्धतशीरपणे प्रचाराचे अभियान राबवून मनसेला ही निवडणूक लढता येईल. स्थानिक प्रश्न विस्ताराने मांडता येतील. युती आणि आघाडीची राजकीय समीकरणे लोकांना पुन्हा उलगडून दाखवता येतील. विधानसभेच्या एकेका मतदारसंघात एक ते पाच हजार मतांनी फरक पडतो. हे लक्षात घेतले आणि पक्षाला मिळालेल्या मतांचा अभ्यास केल्यास निवडणूक लढण्याची मानसिकता तयार होऊ शकेल.आताही न लढण्याचा निर्णय झाला, तर मग २०२२मध्ये होणाºया मुंबई- ठाणे महापालिका निवडणुकांपर्यंत मनसेला वाट पाहावी लागेल. त्यासाठीही कार्यकर्त्यांना तयार करायचे असेल, तळापासून पक्ष संघटनेची बांधणी करायची असेल, तर मनसेला ही निवडणूक लढवावीच लागेल.न लढण्याचा निर्णय घेतल्यास आधीच सैरभैर झालेल्या पक्षाला सावरणे आणखी कठीण होईल. शिवाय, मनसे निवडणुका न लढणारा पक्ष ही प्रतिमा आणखी गडद होईल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019