शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

Vidhan Sabha 2019: 'राज्यात भाजपचे सरकार, फडणवीस हेच मुख्यमंत्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:27 AM

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा; जागांवर अडलेल्या शिवसेनेला दिला इशारा

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे भाजप सरकार येणार असून, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी करत प्रचाराचे रणशिंग फुंकले. युतीचे जागावाटप आणि शिवसेनेचा नामोल्लेखही त्यांनी टाळला. त्यामुळे शहा यांचे हे भाषण शिवसेनेला इशारा असल्याचे मानले जात आहे.गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना राज्यात भाजपला पूर्ण बहुमताने निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहा यांनी आपल्या ३४ मिनिटांच्या या भाषणात शिवसेनेचे नावही घेतले नाही.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी होणाºया या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शहा यांच्या या दौºयातच युतीची घोषणा होणार, शहा मातोश्रीवर जाणार, अशी चर्चा होती, परंतु आपल्या पाऊण तासाच्या भाषणात शहा यांनी जागावाटप आणि शिवसेनेबाबत चकार शब्दही काढला नाही. उलट राज्यात भाजप पूर्ण बहुमताचे सरकार बनवेल आणि देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे ठणकावून सांगितले.काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केल्यापासून या कलमामुळे ४० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरातून आता दहशतवाद हद्दपार होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडणारे शरद पवार यांनी हे कान उघडून ऐकावे असा टोलाही त्यांनी लगावला. कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुम्ही विरोध करता की समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांना स्पष्ट सांगावे असे आवाहन शहा यांनी यावेळी केले.बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणता कामा नये. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कलम ३७० हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणले अशीही टीका शहा यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे