शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:29 IST

चुरशीच्या लढती होणार; अशोक चव्हाण, संभाजी पाटील, मुंडे बहीण-भावाकडे लक्ष

- सुधीर महाजन मराठवाड्यात भाजपने शिवसेनेवर केलेली कुरघोडी हे गेल्या विधानसभा निवडणुकीचे फलित म्हणता येईल. सेनेची केवळ पीछेहाटच झाली नाही, तर बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधील एक जागा ‘एमआयएम’ने हिसकावून घेतली. ही ओहोटी सेनेला रोखता आली नाही आणि आता लोकसभेची औरंगाबादची जागा जिंकून एमआयएमने तर सेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. चंद्रकांत खैरेंसारखा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्की सेनेवर आली, यावरूनच सेनेच्या अवस्थेची कल्पना येते आणि आता या पार्श्वभूमीवर सेना निवडणुकीला सामोरी जात आहे. पाच वर्षांच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची ठिकठिकाणी कोंडी केली.या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, या लढतींकडे सर्वांचे लक्ष असेल. अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढतील का? बीडमध्ये पंकजा आणि धनंजय या बहीण-भावाच्या लढतीकडे साºया राज्याचे लक्ष असेल. अशीच लढत बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये अपेक्षित आहे. एमआयएम आणि वंचित आघाडी यांच्यामुळे एमआयएमला औरंगाबादेत सेनेचा पराभव करता आला; पण आता विधानसभेसाठी ही आघाडी तुटल्याने औरंगाबाद शहरातील राजकीय समीकरण बदलू शकते.प्रचाराचे मुद्देदुष्काळ हा प्रमुख प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. पाच वर्षांपासून सततचा दुष्काळ हा मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने जगण्याचेच प्रश्न मोठे आहेत.पीक विमा हा एक प्रश्न आहे. पीक विमा वाटपात घोटाळा झाला. मिळालेली मदत समन्याय पद्धतीने मिळाली नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी निकष बदलले. शिवाय सर्वांनाच विम्याचा लाभ मिळाला नाही.पिण्याचे पाणी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. अपुºया पावसामुळे एक जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे आहेत. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे.मराठवाड्यातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ४६भाजप-१८शिवसेना-१०काँंग्रेस-०९राष्ट्रवादी-०८एमआयएम-०१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस