शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:35 IST

राष्ट्रवादीला फटका; छोट्या पक्षांची कोंडी

- विनायक पात्रुडकरमुंबई : मुंबई- ठाणे, कोकणातील संख्याबळात सध्या शिवसेना मोठा भाऊ असली, तरी तळकोकणात नारायण राणे यांना भाजप किती बळ देते आणि गणेश नाईक यांच्या प्रवेशाचा ठाणे, रायगड, पालघरमध्ये किती प्रभाव पडतो, यावर भाजपचे मोठेपण ठरेल.मुंबईत भायखळा, मागाठाणे, मालाड, वडाळ््याच्या जागांवरून युतीत वाद असले, तरी सध्याची शिवसेनेची मवाळ भूमिका पाहता ते सुटू शकतील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, धुगधुगी कायम असलेली राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने गमावलेला जनाधार, वंचित-एमआयएमच्या ताकदीचे विभाजन यामुळे युतीपुढे मोठे आव्हान नाही. मनसेचे इंजिन भोंगा वाजवण्याच्या तयारीत असले, तरी त्यांनी स्वत:वर मर्यादा घालून घेतल्याने ते युतीचे किती नुकसान करतील, यावरच लढतीचे चित्र ठरेल.युतीच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा (शहापूर), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), भास्कर जाधव (गुहागर) शिवसेनेत; तर संदीप नाईक (ऐरोली) भाजपमध्ये दाखल झाले. उल्हासनगरात कुमार आयलानी- ओमी कलानी या भाजप नेत्यांत टोकाचे वाद आहेत. ज्योती कलानींचे राजकारण सोयीचे बनले आहे. मीरा-भार्इंदरमध्ये युतीतून विस्तव जात नाही. त्यामुळे तेथे युती होऊनही धुसफूस कायम राहील. कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना यावेळी तगडे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू आहे. ते पाहता सध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचे आव्हान आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपचा एकही आमदार नाही. भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे गुहागरचा दावाही विरला. भाजपमुळे राज्यसभेत गेलेले नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपत विलीन करण्याचा निर्णय घेतला, तरी कणकवलीत नितेश यांचा मार्ग निर्वेध नसेल. रायगडमध्ये फक्त एक आमदार असलेल्या भाजपची भिस्त विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्यावर आहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीनपैकी एक आमदार फोडून शिवसेनेने त्यांच्या कोंडीला सुरूवात केली आहे. एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नालासोपाऱ्याची लढतही कडवी बनते आहे.प्रचारात मुद्दे काय?मेट्रो कारशेडच्या जमिनीचा वाद, कोस्टल रोड, कोळीवाडे- धारावी, बीडीडी चाळी, अभ्युदयनगर, भेडीबाजारचा पुनर्विकास मुंबईच्या प्रचारात केंद्रस्थानी येईल.मेट्रो, एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प, समृद्धी-बडोदा महामार्ग, फ्रेट कॉरिडॉरचे भू संपादन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, क्लस्टरमुळे निर्माण झालेले प्रश्न ठाणे जिल्ह्यात तीव्र आहेत.कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात तेलशुद्ध्किरण प्रकल्प येणार की जाणार, पर्यटनाचा विकास, नवनगराची उभारणी, रोजगाराच्या अपुºया संधी चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.मुंबईसह कोकट पट्ट्यातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ७५भाजप-२६शिवसेना-२८काँग्रेस-०६राष्ट्रवादी-०८इतर-०७

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस