शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: निवडणुकीच्या तोंडावर तुटणार युती? भाजपनं आखली नवी रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:49 IST

युतीचा तिढा सुटेना; मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार, नेत्यांना देणार फिडबॅक

- यदु जोशीमुंबई : युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून २८८ मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीला पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गुरुवारी दिल्लीला जात आहेत.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काल रात्री मॅरेथॉन बैठकी झाल्या. प्रत्येक विभागातील दोन प्रमुख नेते, संघटक यांना बोलावून एकेक संभाव्य उमेदवाराचे नाव त्यांच्याकडून कोअर कमिटीने घेतले. जवळपास ८० टक्के जागांवर एकच नाव पक्षसंघटनेकडून देण्यात आले. २० टक्के जागा अशा आहेत की ज्यावर दोन नावे देण्यात आली. पक्षाने घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, उमेदवारांबाबतचे सर्व्हे, स्थानिक जातीय समीकरणे, विरोधी पक्षाच्या तगड्या संभाव्य उमदेवारांची नावे अशा विविध निकषांवर पक्षसंघटनेकडून निश्चित करण्यात आलेली नावे यावेळी कोअर कमिटीला देण्यात आली.ज्या मतदारसंघांमध्ये एकपेक्षा अधिक नावे कोअर कमिटीला देण्यात आली त्या जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते, जिल्हाध्यक्ष आणि संघाच्या प्रमुखांची पसंती कोणत्या नावाला आहे याचा फीडबॅक तातडीने मागवण्यात आला. हा फीडबॅक आज आला. ‘युती होणार हे निश्चित पण आम्ही सर्वच मतदारसंघांमधील उमेदवार निश्चित केले. ज्या जागा भाजपच्या वाट्याला युतीमध्ये येतील त्यामधील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील’, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. ऐनवेळी युती तुटलीच तर धावपळ नको म्हणूनही भाजपने सर्व उमेदवारांची नावे तयार ठेवली आहेत, पण तशी वेळ येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.दोघांनाही हवे महायुतीचेच सरकारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी मुंबईतील कार्यक्रमात बुधवारी एकाच मंचावर आले होते.माथाडी कामगारांच्या मेळाव्यात या दोन्ही नेत्यांचा एकाच शालीद्वारे सत्कार केला. राज्यात महायुतीचेच सरकार येणार हे त्यांनी ठासून सांगितले. मात्र, युतीत किमान सात जागांवरुन जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. -

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे