Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:08 AM2019-09-28T02:08:53+5:302019-09-28T06:52:01+5:30

१२२ आमदारांपैकी २२-२५ जणांना पुन्हा संधी मिळू शकणार नाही.

Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp likely to cut election tickets of 20 to 30 percent mlas | Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ?

Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ?

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात सत्तेवर असलेला भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत किमान २० ते ३० टक्के विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारू शकतो.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटांवर जिंकून आलेल्या १२२ आमदारांपैकी २२-२५ जणांना पुन्हा संधी मिळू शकणार नाही. गेल्या एक वर्षात भाजपने तीन अंतर्गत सर्व्हे केले त्यातून हा निष्कर्ष निघाली की नव्या चेहऱ्यांना लोकांसमोर आणले पाहिजे.

भाजपचे महाराष्ट्रातील प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भुपेंद्र यादव हे कठोरपणे काम करणारे व कसबी नेते आहेत. पक्षाने जवळपास सगळ्याच जागा जिंकल्या पाहिजेत, असे त्यांना वाटते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच राज्यातील नेत्यांना पक्षाने १५० जागा जिंकण्याच्या (भाजप १६२ जागा लढवण्याची शक्यता आहे) परिस्थितीत असले पाहिजे, असे सांगितले आहे. तरीही भाजप १४४ जागा लढवण्याची शक्यता दिसते. छोट्या पक्षांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढावे अशी भाजपची इच्छा असून तशी तयारी नसेल तर ते त्यांच्या मार्गाने जाण्यास मोकळे असल्याचे भाजपच्या पदाधिकाºयाने सांगितले. विविध संस्थांमार्फत तीन सर्वेक्षण करण्यात आले, तर थेट भूपेंद्र यादव यांच्या निगराणीत एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना उमेदवारी दिली जावी, असे मत या व्यक्त करण्यात आले.

हरियाणा विधानसभेची निवडणूक भाजप एकटा लढणार आहे. गेल्यावेळी ९० जागांपैकी भाजपचे ४७ आमदार निवडून आले होते. सद्य: राजकीय स्थिती बघता हरियाणात विरोधक विखुरलेले आहेत; त्यामुळे भाजप अंतर्गत मूल्यांकन आणि सर्वेक्षणाच्या आधारे किमान १५ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्याची दाट शक्यता आहे.
29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतणार असून त्याचदिवशी होणाºया भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी घोषित केली जाईल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp likely to cut election tickets of 20 to 30 percent mlas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.