Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 07:01 IST2019-09-29T07:00:31+5:302019-09-29T07:01:19+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या यादीला रविवारी दिल्लीतील बैठकीत अंतिम रूप दिले जाणार आहे.

Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या यादीला रविवारी दिल्लीतील बैठकीत अंतिम रूप दिले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, सरोज पांडे, आदींच्या उपस्थितीत त्यासाठी ही बैठक होणार आहे. शिवसेनेशी युतीबाबतची भूमिकाही याच बैठकीत निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.