Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:25 PM2021-06-06T12:25:27+5:302021-06-06T12:26:05+5:30

Coronavirus Lockdown-Unlock Updates: राज्यातील लॉकडाऊन ५ टप्प्यात हटवण्यात येणार असून स्थानिक प्राधिकरणाला आदेशात बदल करण्याचा अधिकारही देण्यात आले आहेत.

Maharashtra Solapur Unlock Updates: New rules for Solapur; know about all details here | Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या

Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या

Next

सोलापूर – कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना आता राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ७ जून पासून महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक उठवलं जाणार आहे. परंतु तत्पूर्वी स्थानिक प्राधिकरणाला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने सुधारित आदेश काढले आहेत.

सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवाशंकर यांनी आदेशात म्हटलंय की, मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आणि देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ७ जून २०२१ पासून सकाळी ७ ते पुढील आदेश होईपर्यंत शहरातील काही निर्बंध अंशत: हटवण्यात आले आहेत.

सोलापूरात काय सुरू आणि काय बंद याबाबत जाणून घ्या

अनु क्रमांकउपक्रमवेळ 
अत्यावश्यक सेवेतील दुकानेनियमितप्रमाणे
बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकानंनियमितप्रमाणे
मॉल्स, थिअटर्स, नाट्यग्रृह, सिंगल स्क्रीन५० टक्के क्षमतेने
उपहारगृहे(रेस्टॉरंट)५० टक्के क्षमतेने
सार्वजनिक ठिकाणं, मोकळी मैदानेनियमितप्रमाणे
खासगी कार्यालयेनियमितप्रमाणे
खासगी आणि सरकारी कार्यालये१०० टक्के क्षमतेने
८ क्रिडापहाटे ५ ते सकाळी ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ इनडोअर गेम्स, आऊटडोअर गेम्स पूर्ण दिवस, परंतु प्रेक्षकांना परवानगी नाही
नेमबाजीनियमितप्रमाणे
१०सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रम५० टक्के क्षमतेने
११विवाह समारंभजास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी
१२अंत्यसंस्कारजास्तीत जास्त २० लोकांना परवानगी
१३ बैठका, निवडणूका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था बैठका५० टक्के क्षमतेने
१४बांधकामनियमितप्रमाणे
१५ कृषी विषयकनियमितप्रमाणे
१६ई कॉमर्स वस्तू आणि सेवानियमितप्रमाणे
१७जमावबंदी, संचारबंदीजमावबंदी कायम असेल
१८जीम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर५० टक्के क्षमतेने परंतु वेळ निश्चित दिल्यानुसार
१९सार्वजनिक वाहतूक सेवा(बस)१०० टक्के क्षमतेने परंतु उभे प्रवासी घेण्यास बंदी
२०मालवाहतूक, एकावेळी ३ जणांना परवानगीनियमितप्रमाणे
२१खासगी वाहनाने, लांबचा प्रवास, आंतरजिल्हा प्रवासनियमितप्रमाणे सुरू राहील परंतु पाचव्या टप्प्यातून येणाऱ्यांना ई पास बंधनकारक
२२उत्पादन क्षेत्रे निर्यात करणारे उद्योगनियमितप्रमाणे
२३इतर सर्व प्रकारचे उद्योग नियमितप्रमाणे 

 

 

Web Title: Maharashtra Solapur Unlock Updates: New rules for Solapur; know about all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.