Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:32 PM2021-05-11T20:32:47+5:302021-05-11T20:33:23+5:30

Maharashtra Corona Updates: कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला यश येताना दिसत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे

maharashtra reports 40956 new COVID19 cases 793 deaths and 71966 discharges in the last 24 hours | Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

Next

Maharashtra Corona Updates: कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला यश येताना दिसत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे आणि नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४० हजार ९५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७१ हजार ९६६ इतकी नोंदवली गेली आहे. 

राज्यात सध्या ५ लाख ५८ हजार ९९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ इतकी झाली आहे. तर कोरोनातून बरं झालेल्यांचा आकडा ४५ लाख ४१ हजार ३९१ इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ७७ हजार १९१ इतक्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदविण्यात आल्यानं महाराष्ट्रासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra reports 40956 new COVID19 cases 793 deaths and 71966 discharges in the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app