CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा उच्चांक! दिवसभरात ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:04 PM2021-03-28T22:04:17+5:302021-03-28T22:20:19+5:30

CoronaVirus in Maharashtra : राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Maharashtra reports 40,414 fresh COVID-19 cases, 17,874 discharges, and 108 deaths in the last 24 hours | CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा उच्चांक! दिवसभरात ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८ जणांचा मृत्यू 

CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा उच्चांक! दिवसभरात ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८ जणांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देआज राज्यात ४० हजार ४१४ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १७ हजार ८७४ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ४० हजार ४१४ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १७ हजार ८७४ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. (Maharashtra reports 40,414 fresh COVID-19 cases, 17,874 discharges, and 108 deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली आहे. तर सध्या ३ लाख २५ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


'...तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा', मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश 

मुंबईत ६ हजार ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात आतापर्यंत एकदाही इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना मृतांचा आकडा ११ हजार ६४९ वर पोहोचला. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांचा सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून निर्वाणीचा इशारा 

पुण्यातही कोरोना संख्येत वाढ!
गेल्या २४ तासांत पुण्यात ४४२६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ३५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याचबरोबर, २१०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६४५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३३१२३ इतकी आहे.

लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. 

Web Title: Maharashtra reports 40,414 fresh COVID-19 cases, 17,874 discharges, and 108 deaths in the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.