शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
4
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
5
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
6
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
7
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
8
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
9
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
10
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
11
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
12
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
13
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
14
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
15
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
16
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
17
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
18
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
19
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
20
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

Maharashtra Rains: राज्यात मुसळधार पाऊस, एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश, नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:52 IST

Eknath Shinde: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले.

मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. याच पार्श्वभूमीवर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी उद्या दिनांक २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह अनेक जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश दिले. 

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे, पाण्याखाली गेलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा याकडे विशेष लक्ष द्यावे. धोकादायक इमारतीत संदर्भात देखील काळजी घ्यावी. मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीत कशी राहील? यासाठी प्रयत्न करा आणि प्रवाशांची काळजी घ्या." 

नागरिकांना आवाहन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे."

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटMumbaiमुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेweatherहवामान अंदाज