शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:46 IST

Maharashtra Rain Forecast: विश्रांतीनंतर पाऊस महाराष्ट्रात जोर धरणार असून, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Heavy Rain Forecast:  अनेक वर्षांनंतर वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने मोठी विश्रांती घेतली. मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पुढील काही दिवसांत हवामान कसे असेल याबद्दलचे अंदाज प्रसिद्ध केले आहेत. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून म्हणजे १३ जूनपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढेल. 

कोकणातील जिल्ह्यांना रेड अलर्ट 

हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. १३ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पश्चिम घाट, सांगली, कोल्हापूर या भागातही अतिमुळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कोकणात पावसाचा जोर कायम राहणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील तीन जिल्ह्यात पावसाचा जोर १४ जून रोजीही कायम राहील. १४ जून रोजी रायगड आणि रत्नागिरी अतिमुसळधार पाऊस पडेल. तर वाऱ्याचा वेगही प्रतितास ५० ते ६० किती इतका असेल. 

वाचा >>इन्कम टॅक्स भरणाऱ्या बहिणींना नाही मिळणार लाडक्या बहीण योजनेचा लाभ? बहिणी शासनाच्या 'रडार'

पुणे, पश्चिम घाट, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहील असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजkonkanकोकणMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भMumbai Rain Updateमुंबईचा पाऊस