शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Live Updates : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:03 IST

मुंबई - आजपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात निर्माण झालेला कमी ...

31 Aug, 21 02:53 PM

हायवेखाली दीड ते दोन फूट साचलं पाणी

31 Aug, 21 02:26 PM

मालाड पूर्वेच्या कुरार गावातील आंबेडकर नगरमध्ये काही घरांवर दगड आणि पावसाचे पाणी, १०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.
 

31 Aug, 21 02:03 PM

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला फटका

31 Aug, 21 01:07 PM

जाणून घ्या महाराष्ट्रात किती आणि कुठे कुठे पाऊस पडेल


 

31 Aug, 21 01:02 PM

आज दिवसभरात राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. उत्तर कोकणात (मुंबई) पावसाचे प्रमाण अधिक राहील
 

31 Aug, 21 12:45 PM

मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर येथे अधिक पावसाची नोंद झाली आहे.
 

31 Aug, 21 12:36 PM

चाळीसगाव ग्रामीण भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविले

चाळीसगाव शहराला महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. परिस्थिती गंभीर झाली आहे.प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे. न.पा.ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत आहे. अशी माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
 

31 Aug, 21 12:30 PM

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय

पालघरमध्ये मंगळवारी येलो अलर्ट तर १ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय होईल. या काळात ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी व्यक्त केली आहे.

31 Aug, 21 12:08 PM

डहाणूत काही गावांशी संपर्क तुटला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या...


 

31 Aug, 21 11:33 AM

४० गावांना पाण्याचा वेढा

अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील ४० गावांना पाण्याचा वेढा, जनावरे गेली वाहून

31 Aug, 21 11:23 AM

चाळीसगाव येथील बामोशी बाबा दर्गापर्यंत पाणी, भाविकांची मोठी तारांबळ उडाली.
 

31 Aug, 21 10:51 AM

पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

अहमदनगर - नगर-कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प, नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक तीन वाजेपासून बंद होती.

31 Aug, 21 11:17 AM

चाळीसगावात एसडीआरएफची टीम दाखल

चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात महापूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे. कन्नड घाटातील दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. कन्नड घाटातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. प्रवाशी वाहने व मालवाहू वाहने नांदगाव व सिल्लोडमार्गे जळगावकडे वळविण्यात आली आहे. घाटाच्या मध्ये काही प्रवाशी अडकून पडले आहे. ग्रामीण भागातही तातडीची मदत पोहचविण्याचे प्रशसनासमोर आव्हान आहे. 
 

31 Aug, 21 11:06 AM

कन्नड घाटात दरड हटविण्याचे काम सुरू

कन्नड घाटात दरड हटविण्याचे काम सुरू, शहराला पाण्याचा वेढा, पावसाचा जोर पुन्हा वाढला, सकाळी १० वाजता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
 

31 Aug, 21 10:51 AM

शेवगाव तालुक्यात जोरदार पाऊस

31 Aug, 21 10:43 AM

मुसळधार पावसामुळे डहाणूत भरले पाणी

31 Aug, 21 10:35 AM

तिसगाव, पाथर्डी तालुक्यातील नदीला पूर


31 Aug, 21 10:24 AM

कन्नड घाटात दरड कोसळली. वाहतूक बंद. सुरळीत करण्याचे काम सुरू


31 Aug, 21 10:15 AM

डहाणूत पावसाचा तडाखा, सखल भागात पूरस्थिती

बोर्डी - हवामान विभागाने 31 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून एलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे रात्रीपासून पावसाचा तडाखा बसत असून मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट मंगळवारी  सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू आहे. यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी पातळी वाढू लागली आहे. 

31 Aug, 21 10:09 AM

औरंगाबाद : कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली. औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प.

31 Aug, 21 10:08 AM

अहमदनगरच्या दक्षिण भागात रात्रभर संततधार, नद्या-नाल्यांना पूर

31 Aug, 21 10:06 AM

भोरटेक ता. भडगाव या गावाला पाण्याचा वेढा

31 Aug, 21 10:01 AM

शहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान

31 Aug, 21 09:59 AM

चाळीसगाव परिसरात नदी-नाल्यांना पूर

चाळीसगाव जि.जळगाव - शहर व ग्रामीण भागात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या  दक्षिणेला असणाऱ्या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे. 

31 Aug, 21 09:57 AM

मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार सरी कोसळणार

मुंबईत सोमवारी सांताक्रुझ वेधशाळेने ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार सरी कोसळणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट