Maharashtra Rains: कुठे कमरेपर्यंत पाणी तर, कुठे दरड कोसळली; मान्सूनने महाराष्ट्र व्यापला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:57 IST2025-06-20T10:56:11+5:302025-06-20T10:57:39+5:30

Maharashtra Weather Updates: कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, धरणक्षेत्रातही धो धो, खडकवासला धरणात दिवसभरात सव्वा टीएमसी पाणीसाठा जमा

Maharashtra rain: IMD issues Red Alert warning of very heavy rainfall | Maharashtra Rains: कुठे कमरेपर्यंत पाणी तर, कुठे दरड कोसळली; मान्सूनने महाराष्ट्र व्यापला!

Maharashtra Rains: कुठे कमरेपर्यंत पाणी तर, कुठे दरड कोसळली; मान्सूनने महाराष्ट्र व्यापला!

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवस पावसाची अशीच बॅटिंग सुरू राहण्याचा अंदाज असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.

बिहार व उत्तर प्रदेशमधील आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरमध्ये आगेकूच करण्यास अनुकूल परिस्थिती आहे. उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणिका रेषा स्थिर आहे.

राज्यात कुठे, काय घडले?

नाशिक : नद्या-नाल्यांना पूर, काही धरणांमधून विसर्ग, गोदावरीला पूर, दुतोंड्याच्या कमरेपर्यंत पाणी
अहिल्यानगर : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, मुळा धरणाकडे २१,५०० क्युसेकने पाण्याची आवक
सोलापूर : उजनी धरणात ६०% साठा; दौंडमधून २१ क्युसेकचा विसर्ग
रत्नागिरी : खेडमधील जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीवर, तुळशी घाटात दरड कोसळली
धुळे : धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात रात्रभर पाऊस
नंदुरबार : वीज पडून २६ मेंढ्या व शेळ्यांचा मृत्यू

घाटमाथ्यावर पावसाचे धुमशान
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावर मात्र पावसाचे धुमशान सुरूच असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड आली. यामुळे रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

कधी, कोणता अलर्ट?
पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवार (दि. २०) 
यलो अलर्ट : ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा घाट परिसर
ऑरेंज अलर्ट : पुणे घाट परिसर २० ते २२ जून
यलो अलर्ट : रायगड, रत्नागिरी. पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहील.

Web Title: Maharashtra rain: IMD issues Red Alert warning of very heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.