शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 06:28 IST

Heavy rain alert in maharashtra: वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. 

मुंबई : कोकण, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असताना विदर्भ, मराठवाडा व खान्देशात पावसाने हूल दिली होती. मात्र, अखेर बुधवारी रात्रीपासून या भागात पावसाचे धूमशान सुरू असून नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. 

वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. 

यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसात झरी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील  केमिकल कंपनीतील शेड कोसळून एक महिला कामगार जागीच ठार झाली. गंगा कंवर (२१) असे मृत महिला कामगाराचे नाव आहे.  

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात सहा गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्याने १३० घरांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

झाडावर अडकले शेतकरी 

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव (ता. मेहकर) येथील पाच शेतकरी शेतात काम करत असताना अचानक आलेल्या पुरात अडकले. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने पाचही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील आसेगाव ते मसलापेनदरम्यान पैनगंगा नदीला आलेल्या पुरात पेडगाव येथील दोन शेतकरी अडकले आहेत. 

पुरात अडकले तीन विद्यार्थी

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील डीगडोह येथे यशोदा नदीला पूर आल्याने तीन विद्यार्थी अडकले. बचाव पथकाने त्यांना दुपारी सुरक्षित बाहेर काढले. कारंजा (घाडगे) तालुक्यात वीज कोसळून दोन सख्खे चुलत भाऊ गतप्राण झाले.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजfloodपूरVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा