Maharashtra Politics :'शरद पवार योग्य निर्णय घेतील';दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल कोल्हेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:55 IST2025-01-03T10:54:33+5:302025-01-03T10:55:23+5:30

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Maharashtra Politics Sharad Pawar will take the right decision Amol Kolhe's big statement about both ncp | Maharashtra Politics :'शरद पवार योग्य निर्णय घेतील';दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल कोल्हेंचं मोठं विधान

Maharashtra Politics :'शरद पवार योग्य निर्णय घेतील';दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल कोल्हेंचं मोठं विधान

Maharashtra Politics ( Marathi News ) :  दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावीत अशी ईच्छा व्यक्त केली होती. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या, आशाताई पवार यांच्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनीही मोठं विधान केले. 'अजित पवार यांच्या मातोश्रींनी भावना व्यक्त केली, कौटुंबिक भावनेतून व्यक्त केली असेल. मी या आधीही सोप समीकरण सांगितलं आहे. शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. सगळ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, याचा विचार करुन शरद पवार निर्णय घेतली, असे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. या विधानामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...”

"सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं हीत कशात आहे. ही भावना लक्षात घेणे महत्वाचे आहे, यावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील. राज्यात अजित पवार यांच्या पक्षाला एकुण मिळालेल्या मतदानाचे ९ टक्के मिळाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला ११.७६ टक्के मिळाले आहे. यात जागा वेगवेगळ्या लढवल्या ही गोष्ट आहे. या मिळालेल्या मतदारांची आपण किंमत करणार आहे की नाही? या मतदारांनी काहीतरी विचार केला असेल की नाही? विचारांची बांधीलकी जपली पाहिजे, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे'

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर लोकांचा रोष आहे. लक्षात घेतला पाहिजे. वाईट पद्धतीने हत्या झाली आहे. या घटनेत कोणालाही पाठीशी न घालता दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे. एखाद्या मंत्र्यामुळे चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य ती पाउलं उचलली पाहिजेत, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

"निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे. पोलिस ठाण्यात बेड का आले आहेत? याची चौकशी केली पाहिजे. गुन्हेगारांना व्हिआयपी ट्रिटमेंट बाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, असं कोल्हे म्हणाले.  

Web Title: Maharashtra Politics Sharad Pawar will take the right decision Amol Kolhe's big statement about both ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.