शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Baramati By Election: "ज्या बारामतीत केवळ मताधिक्याची चर्चा व्हायची, तिथे आज…" रोहित पवारांची काळजाला भिडणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 19:10 IST

भारतीय निवडणूक आयोगाने आज (रविवार, १५ मार्च २०२६) देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या घोषणेनंतर अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय निवडणूक आयोगाने आज (रविवार, १५ मार्च २०२६) देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या घोषणेनंतर अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या बारामतीत केवळ मताधिक्याची चर्चा व्हायची, तिथे आज पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. अजितदादा असते तर, कदाचित ही वेळ आलीच नसते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बारामती हा मतदारसंघ दशकानुदशके पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे आणि अजित पवार यांनी इथून अनेकदा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये बारामतीच्या राजकीय इतिहासाचा संदर्भ देत अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांत मांडली आहे. त्यांनी लिहिले की, "ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली...कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..!"

रोहित पवार यांनी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले. "अजितदादांच्या अपघाताशी संबंधित अनेक महत्त्वाचे तपशील अद्याप लपवले जात असून, लवकरच मी पुराव्यांसह मोठा खुलासा करणार आहे," असाही इशारा त्यांनी दिला आहे.

रोहित पवार यांच्या मते, अपघाताशी संबंधित अनेक तांत्रिक बाबी अद्याप सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत. जनतेला या अपघाताचे संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. "माझ्याकडे असलेली कागदपत्रे आणि तथ्यांच्या आधारे मी लवकरच सर्व सत्य जनतेसमोर मांडणार आहे," असे सांगत त्यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले. लोकशाहीमध्ये पारदर्शकता ही सर्वात महत्त्वाची असते. कोणावरही वैयक्तिक टीका करणे हा माझा उद्देश नसून, केवळ सत्य समोर आणणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांच्या या इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. काही विरोधी नेत्यांनी रोहित पवारांना आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे खरोखरच काही ठोस माहिती असेल, तर त्यांनी ती वेळ न घालवता तातडीने सार्वजनिक करावी. विमानाला असलेले अतिरिक्त इंधन टँक आणि ब्लॅक बॉक्सशी छेडछाड करण्याचा झालेला कथित प्रयत्न, यावर रोहित पवार यांनी यापूर्वीच संशय व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Rohit Pawar's emotional post on Ajit Pawar's absence.

Web Summary : Baramati faces a by-election after Ajit Pawar's death, a shock for the constituency. Rohit Pawar hints at revealing truths about Ajit Pawar's plane crash, alleging hidden details and demanding transparency. He promises to disclose evidence soon.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती