Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:04 IST2024-12-15T12:03:08+5:302024-12-15T12:04:40+5:30

Maharashtra Politics: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज दुपारी ४ वाजता नागपुरात होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

Maharashtra Politics Nitesh Rane, Pankaja Munde, Girish Mahajan will take oath as ministers Who got the call for the oath-taking ceremony? | Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

Maharashtra Politics ( Marathi News ): राज्यात महायुतीने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. दरम्यान, आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याआधी ज्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, त्यांना फोन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपाने आतापर्यंत नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन या आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांनाही फोन गेले आहेत. ज्या आमदारांना फोन आले आहेत ते आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra Politics: आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार?

आज दुपारी ४ वाजता फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी नागपुरात स्टेज तयार झाले असून, आणखी तयारी सुरू आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील ३५ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेऊ शकतात. भाजपच्या कोट्यातून २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये पक्ष काही जागा रिक्त ठेवू शकतो. तर शिवसेनेच्या १३ आणि राष्ट्रवादीच्या १० आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

भाजपच्या कोट्यातून २० आमदारांना संधी मिळणार

१.नितेश राणे 
२.पंकजा मुंडे 
३.गिरीश महाजन 
४.शिवेंद्रराजे देवेंद्र 
५. मेघना बोर्डीकर 
६.जयकुमार गोरे
७. मंगलप्रभात लोढा 

 मुख्यमंत्रिपद  एकनाथ शिंदे यांना हवे होते, त्यामुळेच त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तेव्हा बोलले जात होते.शिवसेनेच्या कोट्यातील १३ आमदार फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. मात्र, गृहमंत्रालयाबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, ते खाते शिवसेनेने मागितले आहे.

एकनाथ शिंदेंनी या पाच नेत्यांना पुन्हा दिली संधी

१.उदय सामंत, कोकण 
२.शंभूराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र 
३. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र 
४.दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र 
५.संजय राठोड, विदर्भ

 या पाच आमदारांवर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा जबाबदारी दिली.

या नव्या नेत्यांना दिली संधी

१.संजय शिरसाट, मराठवाडा 
२.भरतशेठ गोगावले, रायगड 
३.प्रकाश आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र 
४. योगेश कदम, कोकण 
५. आशिष जैस्वाल, विदर्भ 
६.प्रताप सरनाईक, ठाणे

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेतेही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

१.आदिती तटकरे 
२. बाबासाहेब पाटील 
३. दत्तमामा भरणे 
४.हसन मुश्रीफ 
५.नरहरी झिरवाळ

Web Title: Maharashtra Politics Nitesh Rane, Pankaja Munde, Girish Mahajan will take oath as ministers Who got the call for the oath-taking ceremony?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.