Maharashtra Politics : "तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट...", एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:16 IST2025-04-06T17:14:18+5:302025-04-06T17:16:20+5:30
Maharashtra Politics : मंत्र गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Maharashtra Politics : "तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट...", एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये जुंपली
Maharashtra Politics ( Marathi News ) : मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खडसे यांनी एका व्हायरल क्लिपचा हवाला देत मंत्री महाजन यांच्याबाबत गौप्यस्फोट केले, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला. यावरुन आता मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले. 'मी जर तोंड उघडले तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, त्यांच्या घरातीलच गोष्ट आहे',असा गौप्यस्फोट मंत्री महाजन यांनी केला.
भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात टीका केली आहे. दरम्यान, पत्रकारांसोबत संवाद साधत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले. मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. ( Maharashtra Politics )
Monsoon Update : या वर्षी मान्सून कसा असेल, पावसाला सुरुवात कधीपासून होणार?
"माझ्यावर झालेल्या आरोपांवर एक तरी पुरावा दाखवावा, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, असा इशाराही मंत्री महाजन ( Girish Mahajan ) यांनी दिला.
महाजनांचा खडसेंवर निशाणा
गिरीश महाजन म्हणाले, त्यांचं सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात. महाराष्ट्राला माहीत आहे मी काय आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले. "मी त्यांना सीडीचे पुरावे द्या असं वारंवार म्हणत आहे. त्यांचे जावई तीन वर्षे जेलमध्ये होते. त्यांच्या पत्नीला महिला म्हणून आम्ही तुरुंगात जाऊ दिले नाही. त्यांच्याबद्दल आम्ही लवचिकता दाखवली. ते विनाकारण कमरेखालची भाषा करतात. घाणेरडे बोलतात, ते स्वत: महाचोर आहेत, असा निशाणा महाजन यांनी लगावला. ( Maharashtra Politics )