Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 19:09 IST2018-10-08T19:08:33+5:302018-10-08T19:09:43+5:30
राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव अडचणीत : न्यू इंग्लिश शाळेने नाकारली जागा
संतांनीही जातीव्यवस्था नाकारली : शरद पवार
ना पार्थ, ना शरद पवार, लोकसभेसाठी मीच रिंगणात- सुप्रिया सुळे
उदयनराजेंना निवडून आणू, त्यांनी रिपाइंत यावं; रामदास आठवलेंची ऑफर
संजय निरुपम यांच्याविरोधात मनसेची आक्रमक पोस्टरबाजी
... अन् रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ
पुण्यात ब्रेक फेल झालेल्या ट्रकची ६ वाहनांना धडक
Mutha canal : अाश्वासने गेली हवेत विरुन अन पुढारी अाता नाॅट रिचेबल
दिवाळीनंतर होणार राजकीय ‘धमाका’, शत्रुघ्न सिन्हा यांचे संकेत
...तर उदयनराजेंनी स्वाभिमान पक्षात यावे! नितेश राणेंचं आमंत्रण
शिवसेनेचे खासदार संजय राऊतांविरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी