ना पार्थ, ना शरद पवार, लोकसभेसाठी मीच रिंगणात- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:35 PM2018-10-08T16:35:33+5:302018-10-08T16:39:37+5:30

पार्थ पवार लोकसभेसाठी उत्सुक असल्याच्या चर्चेवर सुळेंचं भाष्य

ncp mp supriya sule reacts on loksabha election on parth pawar | ना पार्थ, ना शरद पवार, लोकसभेसाठी मीच रिंगणात- सुप्रिया सुळे

ना पार्थ, ना शरद पवार, लोकसभेसाठी मीच रिंगणात- सुप्रिया सुळे

Next

मुंबई: आमच्या घरातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सुळे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या.

आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे हे पक्षासाठी चांगलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला होणारा विरोध यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या उमेदवारीला कोणी विरोध केला, याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही. आम्ही तिकिटं लादणार नाही. तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ. अनेक मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. 

पार्थनं भविष्यात राजकारणात यायची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना उमेदवारी दिली जाईल का, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. आमची मावळची बैठक झाली. त्यात पार्थनं कोणतीच इच्छा व्यक्त केली नाही. भविष्यात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 
 

Web Title: ncp mp supriya sule reacts on loksabha election on parth pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.