शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
2
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
3
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
4
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
6
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
7
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
8
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
9
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
10
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
11
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
13
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
14
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
15
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
16
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
17
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
18
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
19
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
20
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:23 IST

Maharashtra Municipal Election 2026 Voting Live: सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ ...

15 Jan, 26 09:27 AM

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी कुटुंबासह चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

15 Jan, 26 09:27 AM

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथील बुथ क्रमांक चार वरील पाच नंबर खोलीचे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा मतदान केंद्राबाहेर खोळंबा. 

15 Jan, 26 09:25 AM

नाशिक - शहरात थंडी वाढली सकाळच्या सत्रात मतदानाला अल्पसा प्रतिसाद...live

15 Jan, 26 09:24 AM

अभिनेते नाना पाटेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क, काय म्हणाले?

15 Jan, 26 09:21 AM

मीरारोड मध्ये मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसलेले

मीरारोडच्या शांती नगर प्रभाग २० मधील मतदान केंद्रात भाजपाच्या उमेदवार प्रतिनिधी यांनी छातीवर चारही भाजपा उमेदवार यांचे क्रमवार नावे असलेले कार्ड लावलेली आढळून आली. या विरोधात मनसे उमेदवार यांनी कारवाईची मागणी केली आहे. 

शांतीनगर येथील मतदान केंद्रात सकाळ पासून मतदानास सुरुवात झाली. मात्र भाजपा उमेदवार यांचे मतदान केंद्रात कार्यरत असलेले प्रतिनिधी चक्क छातीवर भाजपाच्या उमेदवारांची क्रम निहाय नावे असलेले कार्ड लाऊन बसलेले होते. मनसेच्या उमेदवार दृष्टी घाग आणि मनसेचे पदाधिकारी दिलीप घाग हे जेव्हा मतदान केंद्रात गेले तेव्हा हा प्रकार पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.

मतदान केंद्रात उघडपणे गैरप्रकार सुरू असताना एकही पोलिस व केंद्रातील अधिकारी यांनी त्यांना रोखले नाही.  उलट भाजपा उमेदवारांचा प्रचार करून भ्रष्ट मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप घाग यांनी केला. 

भाजपाच्या सर्व प्रतिनिधी यांनी उमेदवारांच्या नावांचे कार्ड लावले असताना एकही मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना रोखले का नाही ? असा सवाल केला. पोलिस व पालिका यांनी तत्काळ ह्या प्रतिनिधी आणि उमेदवार वर गुन्हा दाखल करावा. आणि उमेदवारी रद्द करावी अशी मागणी दृष्टी घाग यांनी केली आहे.

15 Jan, 26 09:20 AM

मुंबई: खासदार पियूष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 09:19 AM

मुंबई: भारतरत्न सचिन तेंडुलकर कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर पोहोचले

15 Jan, 26 09:17 AM

मुंबई: बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला

15 Jan, 26 09:11 AM

नाशिक: मतदार याद्यांचा घोळ मतदान यंत्रात बिघाड सुरुवातीला संथ गतीने मतदान

महानगरपालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. मात्र, बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची नावे सापडत नसल्यामुळे किंवा अगोदरच्या मतदान केंद्रा ऐवजी भलत्याच ठिकाणी दूरवरील केंद्रावर मतदाराची नाव असल्यामुळे गोंधळ असल्याचे चित्र आहेत.

काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत कुटुंबातील बहुतांशी सदस्यांची फाटाफूट करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेक मतदार त्यामुळे मतदान न करताच परत जात आहेत. दरम्यान शहरातील आनंदवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएमचा बिघाड झाला तसेच सिडकोतील प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर चार पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे सुमारे तासभर मतदान ठप्प होते अखेरीस नवीन ईव्हीएम आणल्यानंतर मतदान सुरू झाले.

15 Jan, 26 09:10 AM

मुंबईत मतदानाला सुरुवात,मतदार केंद्रावर गर्दी किती?

15 Jan, 26 09:10 AM

मतदान सुरू होण्याआधी पुणेकरांच्या मतदान केंद्रावर रांगा; पुण्यात परिस्थिती काय? Live

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/751993277986930/}}}}

15 Jan, 26 09:09 AM

Pune Live : EVM मशीन बाहेर का नेत आहात? प्रभाग २१ मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/908150501870356/}}}}

15 Jan, 26 09:09 AM

कल्याण डोंबिवलीत काय आहे परिस्थिती?

15 Jan, 26 09:08 AM

खासदार संजय पाटील यांनी कुटुंबासह भांडुपच्या गीता हॉल येथे मतदानाचा हक्क बजावला

15 Jan, 26 09:06 AM

सोलापूर महानगरपालिकेतील २६ प्रभागातील १०२ नगरसेवकांसाठी मतदान सुरु; पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र बंद पडल्याच्या अनेक तक्रारी

15 Jan, 26 09:06 AM

पुणे: संत नामदेव शाळा, प्रभाग क्रमांक २१, बूथ नंबर ७ मध्ये ही मशीनमध्ये एरर; प्रभाग २६ अभ्यासीका वसंत दादा ( घोरपड़े उद्यान) मतदान केंद्र मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया बंद
 

15 Jan, 26 09:05 AM

पुणे: प्रभाग क्रमांक २१ मध्ये, बूथ नंबर १ सिटी इंटरनॅशनल मशीनमध्ये एरर

15 Jan, 26 09:05 AM

पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद

15 Jan, 26 09:04 AM

जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक पार पडत आहे. ६५ जागांसाठी दोन लाख ४५ हजार ९२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २९१ केंद्रांवर मतदान होत असून यासाठी ४२ पोलीस आधिकाऱ्यांसह १५०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान याठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी फाईट रंगणार आहे.

15 Jan, 26 09:01 AM

मुंबई: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 08:59 AM

केवळ चर्चा करण्यापेक्षा बाहेर पडून मतदान केले पाहिजे: अभिनेता अक्षय कुमार

मुंबई मनपा निवडणुकीबद्दल अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, बीएमसी निवडणूक आहे आणि मुंबईकर म्हणून, हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या हातात रिमोट कंट्रोल असतो. त्यामुळे, नंतर गोष्टी व्यवस्थित नाहीत म्हणून तक्रार करण्यापेक्षा, मुंबईतील सर्व लोकांनी बाहेर पडून मतदान केले पाहिजे. योग्य लोकांना निवडण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. जर तुम्हाला मुंबईचे खरे हिरो व्हायचे असेल, तर केवळ चर्चा करण्याऐवजी तुम्ही बाहेर पडून मतदान केले पाहिजे.

15 Jan, 26 08:57 AM

स्थानिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, मतदान करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान: चंद्रशेखरन

मुंबई मनपा निवडणुकीबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, मतदान करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान आहे, आणि मी प्रत्येकाला आवाहन करतो व विनंती करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि मोठ्या संख्येने बाहेर पडावे. स्थानिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि बीएमसी निवडणूक होत असल्याचा मला आनंद आहे. मी नवीन प्रशासनाच्या प्रतीक्षेत आहे.

15 Jan, 26 08:55 AM

पुण्यात भाजपा १२५ जागा जिंकेल, महापौर आमचाच असेल; मुरलीधर मोहोळ यांना विश्वास

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केले. पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे. मी माझ्या कुटुंबासोबत येथे आलो आणि माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मला विश्वास आहे की, पुणेकरांनी गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामाची व्याप्ती पाहिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत मेट्रो केवळ कागदावर होती, पण आम्ही ती प्रत्यक्षात आणली आणि आज सुमारे दोन लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. मला विश्वास आहे की आम्ही १२०-१२५ जागा जिंकणार आहोत आणि महापौर भाजपचाच होईल.

15 Jan, 26 08:53 AM

मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई मनपा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक म्हणाले की, अनेक वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर होत आहे. म्हणूनच ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कोणाला किती मते मिळतील याबद्दल मला काही बोलायचे नाही.

15 Jan, 26 08:49 AM

मुंबईत ८३ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 08:48 AM

गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले

15 Jan, 26 08:47 AM

परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील बूथ क्रमांक एक वरील ईव्हीएम मशीन बंद पडले. येथील बॅलेट युनिट चेंज करण्यात आले.

15 Jan, 26 08:47 AM

पुण्यात माजी राज्यमंत्र्यांवर पैसे वाटण्याची वेळ; काँग्रेसचा आरोप

15 Jan, 26 08:45 AM

प्रशासनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींना आळा घालणे गरजेचे: रवींद्र चव्हाण

डोंबिवलीत पॅनल क्रमांक २९ मध्ये झालेल्या शिवसेना-भाजप राडा प्रकरणावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खरे तर असे घडणे योग्य नव्हते. येणाऱ्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.

15 Jan, 26 08:44 AM

दुबार मतदारांचा घोळ: किशोरी पेडणेकर

दुबार मतदारांचा घोळ घालून ठेवला, जिवंत नसलेल्या माणसांची नावे घातली. जिवंत असलेल्या माणसांची नावे काढली. मुंबईकरांची दिशाभूल करून मतदान होणार असले तर मतदार हुशार आहेत. नंबर असूनही मला मतदान करताना दीड मिनिटे लागले. आता रांगा वाढल्या की किती वेळ लागेल याचा विचार करा, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

15 Jan, 26 08:37 AM

मुंबई: मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 08:36 AM

गणेश नाईकांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

एक तासाच्या धावपळी नंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पूर्ण, गणेश नाईक यांचे निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप

15 Jan, 26 08:35 AM

धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड

धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाला असून, मतदान प्रक्रिया खोलबळी. तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न

15 Jan, 26 08:34 AM

कोल्हापूरमध्ये मोठा खोळंबा, मतदान केंद्रांबाहेर रांगा

कोल्हापूरमध्ये खोळंबला झाला असून अनेक भागात मतदानाला सुरूवात झाल्यानंतर EVM मशीन बंद पडल्या आहेत. मतदारांनी मोठी गर्दी यावेळी मतदान केंद्राबाहेर केली आहे.

15 Jan, 26 08:28 AM

भाजप आमदार संजय केळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार संजय केळकर यांनी सकाळी ७:३० वाजता ठाण्यात आपला मतदानाचा हक्क बजावला. अधिकाधिक लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे केंद्र सरकारला जनतेचा लाभ झाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. ठाण्यातील मतदार देखील रेकॉर्डब्रेक यश देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जात-धर्माच्या भेदांपलीकडे जाऊन विकासाकडे पाहून मतदान करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

15 Jan, 26 08:23 AM

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मतदान केंद्रावर पोहोचले, पी. जोग विद्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ करणार मतदान

15 Jan, 26 08:18 AM

माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

15 Jan, 26 08:04 AM

नागपूर: भय्याजी जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 08:00 AM

मुंबईत मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रावर काय घडतंय?

15 Jan, 26 07:59 AM

पुणे: अंकुश काकडे यांनी नोंदवला आक्षेप

तीन मतदान केल्यानंतर चौथा मतदान झाले, तेव्हा लाईट लागला नाही. ईव्हीएम मशीनमध्ये सात वाजून ४४ मिनिट म्हणजे १४ मिनिट जास्त दाखवत आहे, असा आरोप अंकुश काकडे यांनी मतदानाचा हक्क बजावताना केला.

15 Jan, 26 07:58 AM

मुंबई: भ्रष्ट व अकार्यक्षम पद्धतीने काम करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करा; मतदानाचा हक्क बजावताच मंत्री आशिष शेलार यांचे मतदारांंना आवाहन

15 Jan, 26 07:57 AM

पुणे: रवींद्र धंगेकर आणि मुलाचं औक्षण केलं, कसबा गणपती दर्शनाला निघाले

15 Jan, 26 07:56 AM

अमरावती महानगरपालिकेसाठी मतदान, ८७ जागेसाठी तब्बल ६६१ उमेदवार रिंगणात

15 Jan, 26 07:54 AM

वसई विरारमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे

मतदान प्रक्रिया सुरू होत असतानाच वसईमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे पाहायला मिळाले. वसई वसंत नगरी सर्कल ते एव्हरशाइन पर्यंत हे झेंडे लावण्यात आले आहेत.

15 Jan, 26 07:53 AM

जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर

जालना महापालिका निवडणुकीसाठी शहरातील जवळपास अडीच लाख मतदार मतदानचा हक्क बजावणार आहे. जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. १६ प्रभागातील एकूण ६५ जागेसाठी मतदान प्रक्रिया.

15 Jan, 26 07:51 AM

कोणत्याही उमेदवाराला मतदान करा: मोहन भागवत

कोणत्याही मतदाराला मतदान करा पण मतदान करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोहन भागवत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

15 Jan, 26 07:47 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 07:44 AM

जळगावात मतदानापूर्वी गोंधळ!

जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला. 

15 Jan, 26 07:42 AM

मुंबई: आमदार आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन.

15 Jan, 26 07:28 AM

नागपूर: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर पोहोचले

15 Jan, 26 07:25 AM

पुण्यात मतदानकेंद्र सज्ज, लवकरच मतदानाला सुरुवात

15 Jan, 26 07:16 AM

विधानसभेच्या मतदार याद्या धरल्या ग्राह्य

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. 

15 Jan, 26 07:16 AM

मतदान केंद्रांबाहेर मतदारांची रांग लागायला सुरुवात

मुंबईत मतदानाला सुरुवात होताच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. सकाळपासूनच नागरिक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडत असून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

15 Jan, 26 07:15 AM

नांदेडचा किंग कोण...?

माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये वर्चस्व राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदाच भाजपचे नेते म्हणून मतदारांना सामोरे जात असताना 'पक्ष कोणताही असला तरी नांदेडचा किंग मीच' हे सिद्ध करू शकतील का, याकडेही लक्ष लागले आहे.

15 Jan, 26 07:14 AM

निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था

निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटचा समावेश आहे. 

15 Jan, 26 07:14 AM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध

मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्रात मतमोजणीवेळी काही तांत्रिक अडचण आल्यास 'पाडू' (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राद्वारे निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, 'पाडू'चा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध करण्यात आले आहेत.

15 Jan, 26 07:13 AM

नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक?

कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई येथे भाजप व शिंदेसेनेत अटीतटीची लढत आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक ? आणि कल्याण डोंबिवलीत प्राबल्य शिंदेंचे की रवींद्र चव्हाणांचे याचा फैसला होणार आहे.

15 Jan, 26 07:12 AM

भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळावर

छत्रपती संभाजीनगर येथे अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या या महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळ अजमावत आहेत. 

15 Jan, 26 07:12 AM

पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली

लहानमोठ्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली. भाजपमध्ये अंतर्गत रुसवेफुगवे बघायला मिळाले. 

15 Jan, 26 07:12 AM

नागपूर महापालिका भाजपचा गड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांचे होमपिच असलेली नागपूर महापालिका भाजपचा गड मानली जाते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

15 Jan, 26 07:11 AM

अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांत अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात एकत्र आल्याने येथील निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. 

15 Jan, 26 07:11 AM

मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष

१९ वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्याविरोधात भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी लढत असताना मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

15 Jan, 26 07:10 AM

आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस

सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान गुरुवारी होत आहे. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार हे १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. 

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीMNSमनसेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी