महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:57 IST2026-01-15T18:56:46+5:302026-01-15T18:57:00+5:30

महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठी यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येतं आहे.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Where and what percentage of voting in 29 municipalities in Maharashtra? All eyes on Mumbai results | महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra Municipal Corporation Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली. तब्बल ९ वर्षांनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला असला, तरी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मतदानादरम्यान गोंधळाचे चित्र

सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी समोर आल्या. मतदारयादीतील घोळ, मतदान केंद्र शोधताना मतदारांची धावपळ, बोटावर लावलेली शाई लवकर पुसली जाण्याच्या तक्रारी आणि दुबार मतदानाच्या घटनांचे आरोप...या कारणांमुळे काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

२,८६९ प्रभागांसाठी मतदान; १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य पणाला

राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २,८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांचा समावेश आहे. मुंबईत सुमारे १,७०० उमेदवार, तर राज्यभरात एकूण १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. विशेष म्हणजे, राज्यात ९ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अनेक महापालिकांमध्ये मतदानाचा टक्का घसरलेला दिसत आहे. 

राज्यातील २९ महापालिकांमधील मतदान टक्केवारी (दुपारी ३.३० पर्यंत)

मुंबई महानगरपालिका : ४१.०८%

ठाणे : ४३.९६%

कल्याण-डोंबिवली : ३८.६९%

नवी मुंबई : ४५.५१%

उल्हासनगर : ३४.८८%

भिवंडी-निझामपूर : ३८.२१%

मीरा-भाईंदर : ३८.३४%

वसई-विरार : ४५.७५%

पनवेल : ४४.०४%

नाशिक : ३९.६४%

मालेगाव : ४६.१८%

धुळे : ३६.४९%

जळगाव : ३४.२७%

अहिल्यानगर : ४८.४९%

पुणे : ३६.९५%

पिंपरी-चिंचवड : ४०.५०%

सोलापूर : ४०.३९%

कोल्हापूर : ५०.८५%

सांगली-मिरज-कुपवाड : ४१.७९%

छ. संभाजीनगर : ४३.६७%

नांदेड-वाघाळा : ४२.४७%

लातूर : ४३.५८%

परभणी : ४९.१६%

अमरावती : ४०.६२%

अकोला : ४३.३५%

नागपूर : ४१.२३%

चंद्रपूर : ३८.१२%

इचलकरंजी : ४६.२३%

जालना : ४५.९४%

५.३० वाजेपर्यंतची मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी वेळ लागू शकतो, त्यानंतर, अंतिम टक्केवारी अपडेट केली जाईल. 

Web Title: Maharashtra Municipal Corporation Election 2026 Where and what percentage of voting in 29 municipalities in Maharashtra? All eyes on Mumbai results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.