शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

Maharashtra Minister Portfolios: केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 19:12 IST

Maharashtra Minister Portfolios: आज झालेल्या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 7 खात्याची जबाबदारी असेल.

मुंबई: काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. विस्तारानंतर खातेवाटपाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. भाजप स्वतःकडे महत्वाची खाती ठेवणार, हे बोलले जात होते. झालेही तसेच, भाजपने अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. यात महत्वाचे मानले जाणारे सहकार खातेही भाजपकडेच आले आहे. विशेष म्हणजे, केंद्रात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी आहे.

संबंधित बातमी- CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे?

आज अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर केले आहे. या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे 10 खाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे 7 महत्वाची खाती आली आहेत. यातच, सहकाररखे महत्वाचे खातेही भाजपकडे आले आहे. भाजप नेते आणि औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते देण्यात आले आहे. केंद्रात आणि राज्यात सहकार खाते भाजपच्या वाट्याला आल्याने भविष्यात या विभागाद्वारे महत्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, भाजपने केंद्रात पहिल्यांदाच सहकार खाते निर्माण केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद सहकारात आहे, त्यामुळे भाजपने सहकार खाते घेणे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

कोणाकडे कोणते खाते?आज झालेल्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. 

संबंधित बातमी- कोणाकडे कोणते खाते, क्लिक करुन वाचा संपूर्ण यादी... 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAtul Saaveअतुल सावेAurangabadऔरंगाबाद