Maharashtra Minister Portfolios: केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:37 PM2022-08-14T18:37:44+5:302022-08-14T19:12:32+5:30

Maharashtra Minister Portfolios: आज झालेल्या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 7 खात्याची जबाबदारी असेल.

Maharashtra Minister Portfolios: In center Amit Shah and in state Atul Save got the cooperative ministry | Maharashtra Minister Portfolios: केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..?

Maharashtra Minister Portfolios: केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..?

googlenewsNext

मुंबई: काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. विस्तारानंतर खातेवाटपाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. भाजप स्वतःकडे महत्वाची खाती ठेवणार, हे बोलले जात होते. झालेही तसेच, भाजपने अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. यात महत्वाचे मानले जाणारे सहकार खातेही भाजपकडेच आले आहे. विशेष म्हणजे, केंद्रात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी आहे.

संबंधित बातमी- CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे?

आज अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर केले आहे. या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे 10 खाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे 7 महत्वाची खाती आली आहेत. यातच, सहकाररखे महत्वाचे खातेही भाजपकडे आले आहे. भाजप नेते आणि औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते देण्यात आले आहे. केंद्रात आणि राज्यात सहकार खाते भाजपच्या वाट्याला आल्याने भविष्यात या विभागाद्वारे महत्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, भाजपने केंद्रात पहिल्यांदाच सहकार खाते निर्माण केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद सहकारात आहे, त्यामुळे भाजपने सहकार खाते घेणे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

कोणाकडे कोणते खाते?
आज झालेल्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. 

संबंधित बातमी- कोणाकडे कोणते खाते, क्लिक करुन वाचा संपूर्ण यादी...
 

Web Title: Maharashtra Minister Portfolios: In center Amit Shah and in state Atul Save got the cooperative ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.