UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:14 IST2025-10-01T15:12:53+5:302025-10-01T15:14:02+5:30
UPSC IES ISS Final Results 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठित इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूरच्या मयुरेश भारत वाघमारे यांनी आठवा क्रमांक पटकावला आहे.

UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठित इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत सोलापूरचे मयुरेश भारत वाघमारे यांनी आठवा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, एकूण १२ जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेले मयुरेश वाघमारे हे एकमेव उमेदवार आहेत. यूपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील तब्बल ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
मयुरेश वाघमारे हे सध्या अलिबाग येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले भारत वाघमारे यांचे चिरंजीव आहेत. तसेच, त्यांचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील ही उज्ज्वल कौटुंबिक परंपरा मयुरेश यांनी एक पाऊल पुढे नेत आयएएस श्रेणीतील या परीक्षेत यश मिळवले. या नेत्रदीपक यशानंतर मयुरेश वाघमारे यांची निवड केंद्रीय वित्त मंत्रालयात किंवा रिझर्व्ह बँकेत उच्च पदावर होण्याची शक्यता आहे.
UPSC इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) 2025 अंतिम निकाल-
क्रम | रोल नंबर | उमेदवाराचे नाव |
१ | 0870183 | मोहित अग्रवाल नदबईवाला |
२ | 0270134 | ऊर्जा रहेजा |
३ | 0870379 | गौतम मिश्रा |
४ | 0871414 | प्रशांत कुमार |
५ | 0870561 | सौरभ यादव |
६ | 0570213 | शिवांगी यादव |
७ | 1170098 | अभिषेक नेहरा |
८ | 0570299 | मयुरेश भरत वाघमारे |
९ | 1170171 | संभव पाटनी |
१० | 0870782 | विजय कुमार |
११ | 0871044 | निधी कर्णवाल |
१२ | 3470130 | सुयश राजा शिवम |
मयुरेश वाघमारे यांनी आपले प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे पूर्ण केले. तर, बारावीचे शिक्षण संगमेश्वर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात घेतले.