शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: भाजपकडून १९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 20:37 IST

Todays Maharashtra Breaking News LIVE Updates in Marathi, 25 March 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्...

25 Mar, 26 08:32 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: भाजपकडून १९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

भाजपने आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या १९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

25 Mar, 26 07:30 PM

अजित पवार अपघातप्रकरणी 'झिरो एफआयआर' दाखल; अबू आझमींनी मानले रोहित पवारांचे आभार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी अखेर जिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

25 Mar, 26 07:30 PM

अजित पवार अपघातप्रकरणी 'झिरो एफआयआर' दाखल; अबू आझमींनी मानले रोहित पवारांचे आभार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी अखेर जिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

25 Mar, 26 07:29 PM

अजित पवार अपघातप्रकरणी 'झिरो एफआयआर' दाखल; अबू आझमींनी मानले रोहित पवारांचे आभार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी अखेर जिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

25 Mar, 26 07:26 PM

अजित पवार अपघात प्रकरणी 'झिरो एफआयआर' दाखल; अबू आझमींनी मानले रोहित पवारांचे आभार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी अखेर जिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

25 Mar, 26 05:54 PM

नंदुरबारमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ; पोलिसांकडून सखोल तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही

शहरातील पोस्ट ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालय येथे बॉम्ब ठेवल्याचा मेल प्राप्त झाल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाल करत दोन्ही ठिकाणी धाव घेतली. पोलीस दलासह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात आली.  यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

25 Mar, 26 05:38 PM

अजितदादांच्या अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात निवेदन दिले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर विधान भवनात निवेदन दिले आहे. यावेळी ते म्हणाले, अपघाताचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. बारामती येथे विमानाचा बारामतीनध्ये लँड होण्यापूर्वीच अपघात झाला.  सीबीआय चौकशीसाठीही पत्र दिले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

25 Mar, 26 05:25 PM

गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत नाशिकचा भोंदू बाबा टॉपवर

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकामागून एक समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे सर्वच जण हादरले. विविध प्रकारच्या कर्मकांडांची आणि गैरप्रकारांची ही यादी इतकी मोठी आहे की, लोक याबद्दल गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत. याच कारणामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सोशल मीडिया आणि इंटरनेटवर मोठी खळबळ उडवून दिली. गेल्या ७२ तासांत हे प्रकरण गुगल सर्चमध्ये सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक ठरलं आहे. लोकांच्या वाढत्या उत्सुकतेमुळे हे प्रकरण वेगाने 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीमध्ये टॉपवर पोहोचलं आहे. वाचा सविस्तर
 

25 Mar, 26 05:02 PM

इराण युद्धामुळे परिस्थिती गंभीर, काही देशात शाळा, मॉल्स बंद 

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे जगभरात परिणाम दिसू लागले आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम गरीब आणि विकसनशील देशांवर झाला आहे. या देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढू लागले आहेत, त्याचा थेट फटका सामान्य माणसांना बसत आहे. 

पाकिस्तानातील परिस्थिती खराब होत चालली आहे. ८० टक्के ऊर्जा आयात केली जाते. सरकारने परिस्थितीतून सावरण्यासाठी शाळा बंद केल्या आहेत. सरकारी कार्यालयांसाठी ४ दिवसांचा आठवडा केला आहे. 

बांगलादेशातही परिस्थिती अजून चांगली नाहीये. ९५ टक्के तेल आयात केली जाते. बांगलादेशात अनेक ठिकाणी पंप रिकामे झाले आहेत. श्रीलंकेतही पेट्रोल वाचवण्यासाठी दर बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लोकांना इंधन पास देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. 

इजिप्तमध्ये सरकारने दुकाने आणि मॉल्स लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर १५ ते २२ टक्क्यांनी वाढले आहेत. ही पावले उचलणे आवश्यक होते, अन्यथा परिस्थिती आणखी खराब झाली असती, असे सरकारने म्हटले आहे.

25 Mar, 26 04:22 PM

नांदेड : ७५० कोटींची थकबाकी; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा

नांदेड विभागातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल सातशे पन्नास कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. मागील तीन गाळप हंगामातील ऊस बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही.

25 Mar, 26 04:16 PM

छत्रपती संभाजीनगर : पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी; परिसरात कडेकोट बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या मागील पोस्ट ऑफिसला उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोस्ट ऑफिसच्या आवारात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच बॉम्बशोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण इमारतीची सखोल तपासणी सुरू आहे.

25 Mar, 26 03:31 PM

ओवेसींच्या एमआयएमची हुमायू कबीरच्या पक्षासोबत आघाडी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने आम जनता उन्नयन पार्टीसोबत आघाडी केली आहे. 

असदुद्दीन ओवेसी आणि हुमायू कबीर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, विधानसभा निवडणूक सोबत लढत असल्याची घोषणा केली. 

दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. काही जागांवर दोन्ही पक्षाचे एकमत झाले आहे, तर काही जागांवर अजून चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

25 Mar, 26 03:08 PM

अमरावतीत गॅस सिलेंडर तुटवड्याची ओरड; एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

अमरावती शहरात गॅस सिलेंडरच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

25 Mar, 26 02:22 PM

भिवंडीतील तीन बत्ती मार्केटमध्ये तोडक कारवाई; अतिक्रमणावर पालिकेचा बडगा

भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत तीन बत्ती मार्केट परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सईद चिवणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने केली असून मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली. 

25 Mar, 26 01:52 PM

मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप

मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तिने सांगितलं की, सनोज मिश्रा यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने याबद्दल आपल्या कुटुंबाला सांगितलं आणि विरोध केला, तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट मोनालिसाला गप्प राहण्यास सांगण्यात आलं. वाचा सविस्तर

25 Mar, 26 01:34 PM

हरीश राणानंतर मुंबईतील ४० नागरिकांचा इच्छामृत्यूसाठी पालिकेकडे अर्ज

हरीश राणा यांनी आपल्या आजारपणाला कंटाळून इच्छामृत्यूची मागणी केल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईतून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे आतापर्यंत तब्बल ४० नागरिकांनी इच्छामृत्यूसाठी अर्ज केले आहेत. या अर्जांमुळे प्रशासकीय आणि वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 

25 Mar, 26 01:23 PM

तटकरे-पटेलांनी आमदारांना गप्प केलं; रोहित पवारांचा आरोप

रोहित पवार यांनी सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर गंभीर निशाणा साधला. "सुनित्रा काकींना मला एवढेच सांगायचे की राजकारण खूप वंगाळ झालं आहे. अवतीभवतीचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मला जी माहिती मिळाली त्यानुसार अधिवेशनामध्ये अजित पवार यांच्या अपघाताविषयी एक-दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार बोलला नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताविषयी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीच सांगितलं होतं की अजिबात त्या ठिकाणी बोलायचं नाही," असं रोहित पवार म्हणाले.
 

25 Mar, 26 12:10 PM

अशोक खरातवर आणखी एक गुन्हा

भोंदूबाबा अशोक खरातविरोधोत सोमवारी आणखी एका पीडितेने तक्रार दिली असून चांगलं करिअर घडवून देण्याचं आमिष दाखवत संमोहनाच्या माध्यमातून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. त्यानंतर ठार मारण्याच्या धमक्या देत गप्प ठेवण्यात आलं, तर काही काळानंतर मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाठवून पुन्हा ब्लॅकमेल करत अत्याचार सुरू ठेवल्याचा गंभीर आरोप या तरुणीने केला आहे. वाचा सविस्तर

25 Mar, 26 11:44 AM

खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा

भोंदूबाबा अशोक खरात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून विधीसाठी वस्तू आणायचा, अशी चर्चा असल्याने विशेष तपास पथकाने मंगळवारी इगतपुरी तालुक्यात धडक देत चौकशी केली. नांदगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका स्थानिक बाबाच्या घरी खरात नियमित येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुव्याची शहानिशा करण्यासाठी तपास पथक गावात सखोल चौकशी करणार आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली. भोंदूबाबामार्फत खरातला गंडे दोरे, अंगठ्या यांसारख्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांमधून या भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशयही तपासात व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर

25 Mar, 26 10:46 AM

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, काळजीचे कारण नाही

काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना मंगळवारी उशिरा दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे सोनिया गांधी यांची तब्येत थोडी बिघडली होती. खबरदारी म्हणून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जात असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सोनिया गांधी रुग्णालयात असताना त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियंका गांधी वाड्रा हे दोघेही त्यांच्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहेत.

25 Mar, 26 10:32 AM

दिल्लीच्या करोल बागमध्ये भीषण अपघात

दिल्लीत एक भीषण बस अपघात झाला आहे. करोल बाग भागातील झंडेवालान मंदिराजवळ मंगळवारी उशिरा रात्री एक 'डबल डेकर' बस पलटली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३० प्रवासी होते. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानची ही बस हनुमान मंदिर चौकाजवळ पलटली. या भीषण अपघातात प्रवाशांचं सामान रस्त्यावर विखुरलं असून एकूण २३ प्रवासी जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर

टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईAshok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीIPL 2026आयपीएल २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRupali Chakankarरुपाली चाकणकरMaharashtraमहाराष्ट्रUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर