Latest Marathi News LIVE: ऐतिहासिक आग्र्याचा लाल किल्ला येथे भव्य शिवजयंती सोहळा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 22:57 IST2026-02-19T08:40:26+5:302026-02-19T22:57:32+5:30
Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi 19 February 2026: राज्यसभेची निवडणूक १६ जानेवारीला होणार असून त्यात महाराष्ट्रातील ...

Latest Marathi News LIVE: ऐतिहासिक आग्र्याचा लाल किल्ला येथे भव्य शिवजयंती सोहळा
Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi 19 February 2026: राज्यसभेची निवडणूक १६ जानेवारीला होणार असून त्यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार, मविआचा एकच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. त्यासाठी शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. पण, वय आणि तब्येत पाहता ते या निवडणुकीत उतरतील का, हा प्रश्न आहे. पवारांनी उमेदवारी घेतली, तर निवडणूक बिनविरोध होईल, असं मानलं जातंय. पण, त्यांनी नकार दिला तर महायुती आणि खास करून भाजपा काय भूमिका घेतं, हे पाहावं लागणार आहे. पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीचीही चर्चा आहे. त्याचवेळी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी हा विषयही गंभीर झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चर्चेचा विषय ठरली. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
LIVE
19 Feb, 26 : 09:23 PM
ऐतिहासिक आग्र्याचा लाल किल्ला येथे भव्य शिवजयंती सोहळा
19 Feb, 26 : 09:23 PM
सोलापूर शहराजवळ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी परिसरातील चेट्टीनाड सिमेंट कंपनीत भीषण आग.
Video: सोलापूर शहराजवळ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी परिसरातील चेट्टीनाड सिमेंट कंपनीत भीषण आग. #solapurpic.twitter.com/VhMweny0Xi
— Lokmat (@lokmat) February 19, 2026
19 Feb, 26 : 09:00 PM
जातीय संघर्ष, महापुरूषांची वाटणी... अमोल कोल्हेंचा तरुणांना मोलाचा सल्ला काय?
19 Feb, 26 : 08:17 PM
किल्ले सुवर्णदुर्गावर “मानाचा मुजरा, हटवूया कचरा” उपक्रम उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने आयोजित “मानाचा मुजरा, हटवूया कचरा” हा गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन उपक्रम आज किल्ले सुवर्णदुर्ग येथे उत्साहात संपन्न झाला.जय शिवराय प्रतिष्ठान, दापोली यांच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील युनेस्को दर्जा प्राप्त ११ गडकिल्ल्यांवर “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिम” राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत हा उपक्रम पार पडला. स्थानिक सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
19 Feb, 26 : 08:16 PM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त किल्ले रायगडावर राजांना मानवंदना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर आज अत्यंत भक्तिभावाने मानवंदना देण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले रायगड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांना वाद्यवृंदासह मानवंदना देण्यात आली.
19 Feb, 26 : 08:16 PM
श्री क्षेत्र मढी येथे ५०० वर्षांची परंपरा जपणारी भट्टी (होळी) पारंपारिक उत्साहात
श्री क्षेत्र मढी येथे बुधवारी भट्टीचा म्हणजेच होळीचा सण पारंपारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हुताशनी पौर्णिमेच्या तब्बल पंधरा दिवस आधी होळी साजरी करणारे मढी हे देशातील एकमेव गाव असून, येथील होळीला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे.
19 Feb, 26 : 08:15 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी
नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आमदार, माजी आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे व तसेच सर्वांनी शिवजयंती शांततेत करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे व यावेळी त्यांनी सर्व जनतेस शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिले आहेत.
19 Feb, 26 : 08:14 PM
क्रांती चौकात शिवभक्तीचा महासागर; शिवजयंती उत्सवात शहर शिवमय
शिवगर्जना, ढोल–ताशांचा गजर आणि भगव्या झेंड्यांची लहर यामुळे क्रांती चौकात शिवभक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र दिसून आले. विविध सामाजिक संस्था, युवक व महिला मंडळे, व्यापारी संघटना तसेच शेकडो शिवप्रेमी सकाळपासूनच चौकात दाखल झाले होते. चौकात फुलांची तोरणे आणि भगव्या पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि उपस्थितांनी छत्रपतींना मानवंदना दिली.
19 Feb, 26 : 08:14 PM
शहर वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर; कर्णकर्कश बुलेटस्वारांवर ८ तासांत १०० हून अधिक कारवाई
छत्रपती संभाजीनगर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा धडक मोहीम राबवली. अवघ्या ८ तासांत १०० पेक्षा अधिक बुलेटस्वारांवर कारवाई करत पोलिसांनी १ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला. या कारवाईदरम्यान अनेक दुचाकींवरील मॉडिफाइड सायलेंसर जागेवरच काढून मूळ सायलेंसर बसवण्यात आले. विनाकारण मोठा आवाज करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.
19 Feb, 26 : 08:13 PM
अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात
अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव प्रथमच भव्य आणि दिव्य स्वरूपात जल्लोषात साजरा करण्यात आला. न्यायालय परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. न्यायाधीश, वकील बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग नोंदविला.
19 Feb, 26 : 08:13 PM
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीतील 100 मीटर धावण्याची चाचणी पुन्हा
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती अंतर्गत दि. 11, 12, 13 व 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मैदानी चाचणी प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित कालावधीत मैदानी चाचणी दिलेल्या पात्र उमेदवारांकडून प्राप्त आक्षेपांची दखल घेत भरती मंडळ निर्णय समितीने 100 मीटर धावण्याची चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:00 वाजता पोलीस मुख्यालय कवायत मैदान, तुकूम, चंद्रपूर येथे केवळ 100 मीटर धावण्याची चाचणी पुन्हा घेण्यात येणार आहे.
19 Feb, 26 : 08:12 PM
बुलढाणा जिल्हा परिषदेत राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा शिल्प अनावरण
देशभरात नव्हे तर जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ याठिकाणी ही मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरी केली जात आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते मुख्य इमारती मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा शिल्प अनावरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
19 Feb, 26 : 08:12 PM
शिवटेकडीवर शिवजयंतीचा जल्लोष
अमरावती शहरातील शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सुलभा खोडके तसेच विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी पुष्पहार अर्पण करत शिवरायांना अभिवादन केले.
19 Feb, 26 : 08:11 PM
शिवजयंतीनिमित्त पोलीस विभागाकडून शिवरायांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वर्धा पोलीस विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी मिरवणुका व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ते शांततेत पार पडावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
19 Feb, 26 : 08:11 PM
पाढे पाठ केले नाहीत म्हणून आठवीच्या विद्यार्थिनीला ट्युशन टीचरने उलथन्याने दिले 40 फटके
नवी मुंबईतील गोठीवली गावातील रहिवासी पूनम वडके यांची मुलगी घरगुती शिकवणीला जाते. घरगुती शिकवणी घेणाऱ्या ट्युशन टीचरने विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्यास सांगितले होते. मात्र पाढे पाठ न केल्याने या ट्युशन टीचरने आठवीतील विद्यार्थिनीला चपाती उलटी करण्याच्या उलथन्याने तब्बल 40 फटके मारल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. एवढे फटके हातावर मारल्याने विद्यार्थिनीच्या हाताला सूज येऊन लाल चट्टे आले असून विद्यार्थिनीला प्रचंड वेदना होत आहेत.
19 Feb, 26 : 06:38 PM
झिम्बाब्वेच 'सिकंदर'! ऑस्ट्रेलिया पाठोपाठ श्रीलंकेला मात देत 'ब' गटात अव्वल
झिम्बाब्वे संघाने T20 World Cup 2026 च्या साखळी फेरीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत झिम्बाब्वेने ब गटात अव्वल स्थान कायम राखले.
Zimbabwe leapfrog Sri Lanka into top spot of Group B with a thrilling win 👏📈
— ICC (@ICC) February 19, 2026
#T20WorldCup broadcast details 👉 https://t.co/NPykWM7qqYpic.twitter.com/6nlfHp6Zol
19 Feb, 26 : 06:37 PM
रोहितच्या घरावरील गोळीबाराच्या मास्टरमाइंडचा मास्टर प्लॅन
रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. तपासादरम्यान समोर आलं आहे की, आरोपी दीपक शर्माला या गुन्ह्यासाठी १५ लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं. आरोपी शुभमने त्याला फक्त घराबाहेर गोळ्या झाडण्यास सांगितलं होतं. या कामासाठी ५० हजार रुपये एडव्हान्स म्हणून देण्यात आले. उर्वरित १४.५० लाख रुपये काम झाल्यानंतर देण्याचं ठरलं होतं, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी दीपकला अटक केली. वाचा सविस्तर
19 Feb, 26 : 05:04 PM
नागपुरात शिवजन्मोत्सवाचा सोहळा,भव्य पालखी आणि ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना
19 Feb, 26 : 03:40 PM
आमच्यावर आरोप करणारे, स्वतःच हिंसा भडकावत आहेत; काँग्रेस खासदार संतापल्या
करणी सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर २५ खासदारांना अटक झाली नाही, तर त्यांनाही गोळ्या घालू, अशी धमकी दिली.
या व्हिडीओनंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. "आमच्यावर खोटे आरोप करणारे स्वतःच हिंसा भडकावत आहेत. भाजपा जेव्हा राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाही, तेव्हा त्यांनी आधी आमच्यावर खोटे आरोप केले. तेही निरुपयोगी ठरले, तर आता करणी सेना राहुल गांधींना मारण्याची धमकी देत आहे. आता या प्रकारच्या धमकीवर सरकार काय कारवाई करणार आहे?", असा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
19 Feb, 26 : 02:51 PM
...मग उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षही ठरले असतील, भुजबळांचा टोला
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत अजितदादांनी आम्हाला काही सांगितले नाही. विलीनीकरण झाले सुद्धा नाही त्याआधीच कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकले होते? मग त्यात उपमुख्यमंत्री कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हेही ठरले असेल अशा शब्दात छगन भुजबळांनी रोहित पवारांच्या दाव्याची खिल्ली उडवली. संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद अमोल कोल्हे यांना देण्याची अजितदादांची इच्छा होती असं रोहित पवार म्हणाले होते.
19 Feb, 26 : 12:32 PM
पुणे- मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे, खंडाळा बोगद्याआधी वाहतूक कोंडी झाली आहे, ५ ते ६ किलोमीटर पर्यंतच्या रांगा असून एका बाजूने काही काळ वाहतूक थांबवून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
19 Feb, 26 : 12:26 PM
मराठी लोकांनीही गुजरातला जाऊन व्यवसाय केला पाहिजे - गणेश नाईक
बुलेट ट्रेन गुजरातहून मुंबईला येणार आहे. गुजरातच्या लोकांनीच इथे यावे असा काही सिद्धांत नाही तर मराठी लोकांनीही गुजरातला जाऊन व्यवसाय केला पाहिजे. मराठी माणूसही कुठे कमी नाही असं विधान वनमंत्री गणेश नाईकांनी केले आहे. पालघर येथे ग्लोबल कोकण महोत्सव आणि सरस प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
19 Feb, 26 : 11:46 AM
मुंबई मेट्रोच्या रेड लाइनमध्ये तांत्रिक बिघाड...
मुंबई मेट्रोच्या रेड लाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो गुंदवली स्थानकात गेल्या १५ ते २० मिनिटांपासून थांबून आहे. यामुळे गुंदवली ते अंधेरी पश्चिम मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे.
19 Feb, 26 : 11:43 AM
राज ठाकरे-आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर एकत्र, कामाचा केला शुभारंभ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे काका-पुतणे शिवजयंती निमित्त एकत्र आले. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्ही नेत्यांनी अभिवादन केले आणि त्यानंतर शिवाजी पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
19 Feb, 26 : 11:35 AM
'त्या' भेटीने अनेकांना पोटशूळ उठले, नरेश म्हस्केंचा टोला
काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठले. परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल अशी भावना खासदार नरेश म्हस्के यांनी मांडली.
काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार @एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @राज ठाकरे साहेब यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला... परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी,… pic.twitter.com/hYnGgupyy2
— Naresh Mhaske (@nareshmhaske) February 19, 2026
19 Feb, 26 : 10:37 AM
शिवजयंती निमित्त राहुल गांधी यांनी केले छत्रपती शिवरायांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिवरायांना अभिवादन केले. शिवाजी महाराज हे शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय्य नेतृत्वाचे एक अद्वितीय प्रतीक आहेत. त्यांचे तत्वज्ञान आणि धैर्य आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देते असं त्यांनी म्हटलं.
शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2026
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है। pic.twitter.com/P6hjY1KBE6
19 Feb, 26 : 10:25 AM
अभिनेता रितेश देशमुखने शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ले शिवनेरीवर
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असून, अभिनेता रितेश देशमुखही सोहळ्यात सहभागी झाला.
#WATCH पुणे, महाराष्ट्र: अभिनेता रितेश देशमुख ने कहा, "आज शिव जयंती है और मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। आज का दिन बहुत सौभाग्य का दिन है। आज के दिन छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ था और उनकी कीर्ति और शौर्य के बारे में सभी लोगों को पता है...वे हमें नई ऊर्जा और प्रेरणा देते… pic.twitter.com/5ZYJE2Tgkx
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2026
19 Feb, 26 : 09:21 AM
शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा
किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडला जात आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह असंख्य शिवप्रेमी जनतेने हजेरी लावली आहे.
◻️LIVE 📍किल्ले शिवनेरी 🗓️19-02-2026 🙏🏻🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा - लाईव्ह https://t.co/goslQ043sv
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 19, 2026
19 Feb, 26 : 09:18 AM
भिगवणमधील 'त्या' तरुणीचा अजूनही शोध सुरूच
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील तरुणीचे अपहरण झाले. या प्रकरणात तरुणीचा व्हिडीओ समोर आला असून, आपण स्वमर्जीने पळून गेल्याचे ती सांगत आहे. असे असले तरी तरुणी आणि ज्याच्यासोबत ती गेली आहे तो तरुण सापडलेला नाही. पोलिसांची सहा पथके तरुणीचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापही ठावठिकाणा सापडलेला नाही.
19 Feb, 26 : 09:00 AM
व्हीएसआर कंपनीवर तात्काळ बंदी घाला; आता जय पवारांनीच केली मागणी
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. जे विमान कोसळून अजित पवारांनी जीव गमवावा लागला, ते विमान व्हीएसआर कंपनीचे होते. या कंपनीच्या विमान वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली होती. आता अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनीही "व्हीएसआरला तात्काळ विमाने चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीमध्ये झालेल्या गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे."
19 Feb, 26 : 08:56 AM
महाराष्ट्रातून राज्यसभेत कोण खासदार होणार, ७ जागांवर कोणाची लागणार वणी?
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसह एकूण ३७जागांसाठी बुधवारी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.