शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 07:44 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे.

नाशिक : इयत्ता तिसरी पास  असलेल्या अन् सालदार म्हणून एका शेतकऱ्याकडे काम करणाऱ्या मजुराने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ना प्रचार केला..., ना कुणाच्या गाठीभेटी घेतल्या. निवडणूक होईपर्यंत हा उमेदवार कुणाला दिसलाही नाही. पण निकालाचे आकडे जाहीर झाले अन्  पठ्ठ्याला मते मिळाली तब्बल १ लाख ३ हजार ५२६. होय या उमेदवाराचे नाव आहे बाबू सदू भगरे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. आडनावातील साधर्म्यामुळे बाबू भगरे यांना १ लाखाहून अधिक मते मिळाली. भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा केलेला पराभव लक्षवेधी ठरला परंतु त्याहून अधिक चर्चेत व प्रकाशझोतात आले ते अपक्ष उमेदवारी करत लाखभर मते मिळविणारे बाबू सदू भगरे. 

चिन्हानेही खेचली मते बाबू सदू भगरे हे एकलहरेतील गंगावाडी परिसरात राहणारे असून सालदार म्हणून कामाला आहेत. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी नावापुढे कंसात ‘सर’ ही उपाधी देखील लावली. विशेष म्हणजे त्यांना ट्रम्पेट ही तुतारी सदृश  निशाणी मिळाली. त्यामुळे आडनावासह चिन्हामुळे त्यांना अधिक मते मिळाल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :dindori-pcदिंडोरीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल