शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
2
"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 
4
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
5
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक
6
लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...
7
video: अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितले कारण, पाहा...
8
४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले
9
"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका
10
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
11
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
12
खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
13
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
14
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
15
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
16
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
17
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
18
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
19
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
20
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...

महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

By यदू जोशी | Published: April 06, 2024 7:13 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग  हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिंदेसेनेकडे  जातील.  नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी तेथे महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

- यदु जोशी मुंबई - महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग  हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिंदेसेनेकडे  जातील.  नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी तेथे महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ठाणे आम्हालाच हवे, असा प्रचंड आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला आहे. दहाएक जागांवर असलेला महायुतीचा तिढा आता दोन-तीन जागांवर आला आहे. 

कोकणच्या पट्ट्यात भाजपकडे भिवंडी आधीपासूनच आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गची भर पडेल.  शिंदेसेनेकडे कोकणात कल्याण, पालघरबरोबर ठाणे राहू शकते. ठाण्यासाठी शिंदेंनी सुचविलेले उमेदवारांचे पर्याय भाजपला मान्य नाहीत. शिंदेंनी प्रताप सरनाईक यांना लढविल्यास भाजप राजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरनाईक तेवढे इच्छुक नाहीत. त्यावर भाजपचे संजीव नाईक यांनी शिंदेसेनेकडून लढावे, असा प्रस्तावही विचाराधीन आहे. 

- साताराची जागा अजित पवार गटाला मिळणार नाही, ही जागा भाजपकडे जाईल आणि तिथे उदयनराजे भोसले उमेदवार असतील, असे भाजपच्या गोटातून समजले. - नाशिकची जागा छगन भुजबळांसाठी आम्हाला द्या, यासाठी अजित पवार गट अडून बसला आहे. विद्यमान खासदार शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांनी ही जागा आम्हालाच मिळणार असे ठामपणे सांगितले आहे. दोन्ही गटांत खूपच ताणले गेले तर ही जागा आम्हाला द्या, असे ऐनवेळी भाजप म्हणू शकते. भाजपकडून आ. सीमा हिरे किंवा आ. राहुल ढिकले यापैकी एकाचा विचार होऊ शकतो. - उत्तर-पश्चिम मुंबईची जागा शिंदेसेनेला मिळू शकते. - रत्नागिरी-सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळेल. - कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे तर पालघरमध्ये राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार शिंदेसेनेकडून लढणार हेही जवळपास निश्चित आहे. - औरंगाबाद शिंदेसेनेकडे गेले असून रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४