शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

फडणवीस यांच्या शिष्टाईनंतरही माढ्यातील तिढा कायम, उत्तम जानकर संध्याकाळी निर्णय जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 2:03 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी बंडखोरीची तुतारी फुंकल्यानंतर उत्तम जानकर यांनीही विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत पुढाकार घेत उत्तम जानकर यांना नागपूरमध्ये बोलावून घेत चर्चा केली.

जाहीर केलेल्या उमेदवाराला विरोध, इच्छुकांची नाराजी, बंडखोरी आणि मित्रपक्षातील नेत्यांकडून घेण्यात आलेली ताठर भूमिका यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवताना भाजपाच्या नाकी नऊ येत आहेत. एकीकडे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी बंडखोरीची तुतारी फुंकल्यानंतर उत्तम जानकर यांनीही विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत पुढाकार घेत उत्तम जानकर यांना नागपूरमध्ये बोलावून घेत चर्चा केली. मात्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतरही माढ्यातील तिढा कायम असल्याचं चित्र आहे. तसेच आपण आज संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू, असे सांगत सस्पेन्स वाढवला आहे. 

धैर्यशिल मोहिते पाटील हे भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्यानंतर उत्तम जानकर हेसुद्धा मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे सावध झालेल्या भाजपाने हालचाली करून जानकर यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी उत्तम जानकर यांना नागपूरला येण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. तसेच उत्तम जानकर यांच्यासोबत माढ्यातील भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आदी नेतेमंडळीही फडणवीस यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले. 

या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, आज देवेंद्र फणडवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांचे काही प्रश्न फडणवीस यांच्यासमोर मांडले. आता मी आज संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून आपला निर्णय जाहीर करणार आहे, असे उत्तम जानकर यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस