महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 22:30 IST2025-03-30T22:29:32+5:302025-03-30T22:30:38+5:30

Maharashtra Kesari result: कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

Maharashtra Kesari result: Shivraj Rakshe still objects to the match result; but... | महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण...

महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण...

अहिल्यानगरमध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत पंचाच्या निकालावर आक्षेप घेत, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती. या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. आज कर्जत येथे झालेल्या उपांत्य फेरीतही राक्षेने निकालावर आक्षेप घेतला होता. परंतू, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला. 

Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. दरम्यान, अंतिम लढतीच्या आधी उपांत्य फेरीत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगली. या कुस्तीत पृथ्वीराज याने शिवराजवर मात केली. यावेळी शिवराज याने तांत्रिक बाबी तपासण्याची मागणी केली होती. मात्र, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेडच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत रविवारी सायंकाळी केसरीची अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक लढतीला मैदानात तुतारी आणि हलगीचा निनाद घुमत होता.

सेमी फायनलमध्ये काय झालेले...
गादी विभागात नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरचा संग्राम पाटील यांच्यात सेमी फायनलची कुस्ती रंगली. यात शिवराज राक्षेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत ११ गुण मिळवत बाजी मारली. संग्राम पाटीललाही उपांत्य कुस्तीत एकही गुण मिळविता आला नाही. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये मुंबईच्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध सोलापूरच्या शुभम माने यांच्यात झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली. पाटील याने सुरुवातीपासूनच माने याच्यावर पकड घेत ११ गुण प्राप्त करीत विजय मिळविला. शुभम मानेलाही एकही गुण मिळविता आला नाही.
 

Web Title: Maharashtra Kesari result: Shivraj Rakshe still objects to the match result; but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.