शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा निर्णय; 'थर्टी फर्स्ट'च्या मध्यरात्री करणार 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 2:45 PM

संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना माझे सहकारी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील... 

पुणे / मुंबई : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताची प्रत्येक जण जल्लोषात तयारी करत आहे. पण यंदा कोरोनाचे सावट असल्याने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र तरीदेखील नागरिकांचा 'उत्साह' कायम असणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ते देखील ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे.   

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जल्लोषात सहभागी न होता आपल्या पोलीस दलाचा उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते स्वतः पुण्याच्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. एवढेच नव्हे तर 'कंट्रोल रूम'ला येणारा नव्या वर्षातला पहिला म्हणजेच 31 डिसेंबरच्या रात्री बरोबर बारा वाजता येणारा पहिला 'कॉल' स्वतः देशमुख घेणार आहेत. 

देशमुख म्हणाले, मी स्वतःला महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख मानतो. माझे सहकारी कोरोना काळात अथक काम करत असताना त्यांना भेटण्यासाठी मी 32 जिल्ह्यांचा प्रवास केला. उद्देश एवढाच होता की मी त्यांच्यासोबत आहे याची जाणीव त्यांना व्हावी. सणवार, उत्सव या सगळ्यात पोलीस दल रस्त्यावर असतो. आताही तसेच होणार. संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना माझे सहकारी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील. 

३१ च्या मध्यरात्री मी त्यांच्यासोबत राहणार आहे.त्यातही पोलीस नियंत्रण कक्षातील माझ्या कर्मचाऱ्यांना सतत 'अलर्ट' राहावे लागते. मात्र, तुलनेने त्यांना अधिकार आणि मान मिळत नाही. त्यामुळे हा विभाग काहीसा दुर्लक्षित आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा मी तिथे जाऊन देणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. 'कंट्रोल रूम'ला रात्री बारा वाजता येणारा पहिला 'कॉल' देखील मीच घेणार आहे असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. 

............सरत्या वर्षावर कोरोनाचे मळभ होते. आगामी वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी 'होप २०२१' असे लिहिलेला केक  पोलीस सहकाऱ्यांसोबत कापून तआनंदाचे चार क्षण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. राज्यातील प्रत्येक शहरातल्या पोलीस आयुक्तांनी हा उपक्रम राबवावा असेही मी सुचवले आहे         - अनिल देशमुख,गृहमंत्री.  

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसNew Yearनववर्ष31st December party31 डिसेंबर पार्टी