maharashtra govt requests kerala govt to provide experienced doctors and trained nurses of corona virus cases sna | CoronaVirus News: कोरोनाविरोधातील युद्धात महाराष्ट्राने 'या' राज्याकडे मागितली मदत; अनुभवी डॉक्टर, नर्स पाठवण्याचे केले आवाह

CoronaVirus News: कोरोनाविरोधातील युद्धात महाराष्ट्राने 'या' राज्याकडे मागितली मदत; अनुभवी डॉक्टर, नर्स पाठवण्याचे केले आवाह

ठळक मुद्देकोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. देशाचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्‍ट्र सरकारने मुंबईतील महालक्ष्‍मी रेसकोर्स भागात 600 बेडचे कोविड 19 रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. देशाचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा स्थितीत, कोरोना व्हायरसला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केरळ सरकारला मदतीचा हात मागत, मुंबईमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सना पाठविण्याचे आवाहन केले आहे. 

महाराष्‍ट्र सरकारने लिहिलेल्या या पत्रात म्हणण्यात आले आहे, की महाराष्‍ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात भविष्‍यातही कोरोनाचे नवे रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

सध्यस्थिती पाहता, महाराष्‍ट्र सरकारने मुंबईतील महालक्ष्‍मी रेसकोर्स भागात 600 बेडचे कोविड 19 रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 125 बेडचे आयसीयूदेखील असेल. कोरोनाची मध्‍यम लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना येथे ठेवण्यात येईल. 

CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला होता. यावेळी केरळमध्ये कोरोना व्हायरसचा सामना कशा पद्धतीने  केला जात आहे, यावर चर्चा झाली होती.

सध्या महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रात रविवारी एकाच दिवसात 3 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित सापडले. याच बोरोबर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 हजारच्याही पुढे गेला आहे.

CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra govt requests kerala govt to provide experienced doctors and trained nurses of corona virus cases sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.