शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राज्याच्या सत्ताकारणाला वेगळा आकार; राज ठाकरेंचं 'ते' स्वप्न भाजपा करणार साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:59 IST

मनसेचा केवळ एक उमेदवार विजयी होऊनही राज यांचं स्वप्न सत्यात

मुंबई: राज्याला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी विधिमंडळात चांगला विरोधी पक्ष असायला हवा, असं आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली. भाजपाला रोखण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडणुकीत विजयी झाला. परंतु राज ठाकरेंनी पाहिलेलं प्रबळ विरोधी पक्षाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं एका दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला आदेश, अजित पवारांचं फसलेलं बंड यामुळे काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत पहिला क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपावर विरोधी बाकांवर बसण्याची नामुष्की ओढवली आहे. तर राज्यातील दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांकाचा पक्ष सत्तेत जाणार आहे. मात्र त्यांच्यासमोर तब्बल १०५ आमदारांसह विरोधी पक्षात असलेल्या भाजपाचं आव्हान असेल. नव्या विधानसभेत शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. या आमदारांची एकूण संख्या पाहिल्यास ती १५४ वर जाते. याशिवाय शिवसेनेला काही अपक्ष आमदारांचादेखील पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीनं १६२ आमदारांना एकनिष्ठतेची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं. महाविकासआघाडीला विधानसभेत १०५ आमदार असलेल्या भाजपाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे तीन प्रमुख पक्षांचं आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असा सामना विधानसभेत पाहायला मिळू शकतो. राज ठाकरेंनी निवडणूक प्रचारात राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरेंचं हे स्वप्न आता साकार होणार आहे.राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडून आला. कल्याणमधून राजू पाटील विजयी झाले. राज ठाकरेंनी आपल्याला विरोधी पक्षात बसायचं आहे, असं म्हटलं होतं. मात्र त्यांचा एकमेव आमदार सत्तेत जाण्याची शक्यता आहे. पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदं दिलं जाऊ शकतं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेनं अनेक ठिकाणी एकमेकांना सहकार्य केलं होतं. त्याची परतफेड म्हणून पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस