शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

Maharashtra Government: मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही- उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:16 PM

आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत,

मुंबईः आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात आलो, सभागृहात आलो हे माझं भाग्यच आहे. सभागृहात येण्याचं दडपण होतं, मला सभागृहात कसं होईल याची चिंता होती, पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावरती घेणारा आहे. आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभेच्या सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.  देशात अनेक राज्य आहेत, त्यात आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. आता संपूर्ण देशही आपलाच आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं, त्या मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचे आम्ही भक्त आहोत. मी छत्रपती महाराजांची शपथ घेतली, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, हा जर गुन्हा असेल, तर तो एकदा नाही तर प्रत्येक जन्मात तो मी करेन, जो आईवडिलांना मानत नाही, तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाही. विरोधकांशी सामना करणं हा आमचा अधिकार आहे. आम्हाला साधू, संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले आहेत. माझ्या मंत्रिमंडळावर या सभागृहानं जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल मी आपल्यामार्फत सर्वच सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त करतो. मी तमाम मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कारभार करता येणं शक्य नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीची बहुमत चाचणी पार पडली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला. महाविकास आघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहिले आहेत. तर भाजपाने सभात्याग केला आहे.

दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.  ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.  विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत या सदस्यांना परिचय करून दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना