शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Maharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 18:57 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, विधानसभेचा संभाव्य निकाल काय असेल, याबाबत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, विधानसभेचा संभाव्य निकाल काय असेल, याबाबत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. तसेच विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधूनही संभाव्य निकालाचा कल सांगितला जात आहे. दरम्यान, आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने व्हीडीपीएच्या हवाल्याने एक एक्झिट पोल प्रसारित केला असून, या पोलमधूनसुद्धा राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यासह पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.व्हीडीपीएच्या एक्झिट पोलनुसार  राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपाला 126 ते 135 जागा मिळतील. तर शिवसेनेला 79 ते 88 जागा मिळतील. मात्र काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर घसरण होईल, असा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. या पोलमधील आकडेवारीनुसार काँग्रेसला केवळ 16 ते 26 जागा मिळतील , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस तुलनेने चांगली कामगिरी करणार असून, राष्ट्रवादीला 33 ते 43 जागा मिळतील, असे हा एक्झिट पोल म्हणतो. इतर पक्षांचा विचार केल्यास अन्य एक्झिट पोलप्रमाणेच या एक्झिट पोलमध्येही मनसेला फार यश मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसेला 0 ते 1 जागा मिळेल. तर वंचित बहुजन आघाडी 2 ते 5 जागा जिंकण्यात यशस्वी ठरेल. तर इतर 5 ते 13 जागी विजय ठरतील.दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सोमवारी मतदान पार पडलं. यानंतर  एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी 3 पर्यंतचं मतदान गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महायुतीच विजयी होईल, अशी सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळू शकतात. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील पाच वर्षेदेखील विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 55 ते 81 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  मागील निवडणुकीत राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी 122 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना 63 जागा जिंकून दुसऱ्या स्थानी राहिली होती. त्यावेळी काँग्रेसला 42, राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर काही दिवसांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस