महाराष्ट्र निवडणूक 2019: अपक्षांसह पंधरा ते वीस आमदार संपर्कात - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:17 IST2019-11-18T03:35:34+5:302019-11-18T06:17:50+5:30
मेगाभरती करणार नाही, मेरिटवर भरती करू- जयंत पाटील

महाराष्ट्र निवडणूक 2019: अपक्षांसह पंधरा ते वीस आमदार संपर्कात - जयंत पाटील
पुणे : भाजपमध्ये गेलेले व अपक्ष असे पंधरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत़ मात्र आम्ही मेगाभरती करणार नसून, मेरिटवर भरती करू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी झाली. या बैठकीला जाताना पाटील माध्यमांशी बोलत होते़ ते म्हणाले, जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावे आम्ही आताच जाहीर करणार नाही. ते त्यांच्यासाठी अडचणीचे ठरेल. भाजपची विचारधारा व आमची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे़ त्यामुळे आम्ही कधीही त्यांच्याबरोबर जाणार नाही. शिवसेनेबरोबरच्या जाण्याच्या निर्णयाबाबत त्यांना छेडले असता त्यांनी, दगडापेक्षा वीट मऊ, असे सांगून त्यांनी यावर जास्त
बोलणे टाळले.