शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

Maharashtra Government: महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर सस्पेन्स; सोनिया गांधींच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 15:06 IST

राज्यात सरकार बनविण्यासाठी निर्णायक बैठक शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात होणार आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटेल असं चित्र दिसत आहे. मात्र अद्यापही काँग्रेसच्या हायकमांडकडून अंतिम निर्णय आला नाही. शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्यास सोनिया गांधी अद्यापही तयार नाही. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडत आहे. त्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्याचसोबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचीही बैठक होणार आहे तर दुसरीकडे भाजपानेही सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे. 

राज्यात सरकार बनविण्यासाठी निर्णायक बैठक शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात होणार आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हे सोनिया गांधी यांच्या इच्छेविरोधात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तयार केलं आहे. पण सोनिया गांधी या नवीन समीकरणामुळे नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणं आहे की, अद्यापही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नवीन समीकरणाला मान्यता दिली आहे. अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे हेदेखील सोनिया गांधी यांना आवडलं नाही. 

त्याचसोबत महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या नेत्यांच्या बैठकीत तयार झालेल्या किमान समान कार्यक्रमातील काही मुद्द्यावर काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना आक्षेप आहे. शरद पवारांशी भेट झाल्यानंतर या बैठकीत ते या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक यशस्वी झाली तर शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 

काँग्रेस नेत्यांमुळे राज्यपाल भेटीचा कार्यक्रम रद्द राज्यातील ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते राज्यपालांची भेट घेणार होते. शनिवारी दुपारी ही भेट होणार होती. मात्र काँग्रेस नेते अनुपस्थित असल्याने ही भेट रद्द करावी लागली. काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ नेता मुंबई नसल्याने ही भेट रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. 

भाजपाशिवाय कोणाचं सरकार येणार नाही दादरमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक गेल्या तीन दिवसांपासून सुरु होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाशिवाय राज्यात कोणाचं सरकार येणार आहे. सरकार आपलचं येणार आहे असा दावा केला. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हा दावा केला.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019